कलबुर्गी येथील बसव जयंती मिरवणुकीत सोलापूरच्या जागतीक लिंगायत महासभा महीला शाखेच्या सदस्यांनी शरणांच्य वचनावर सादर केलेल्या लेझीम नृत्याने लक्ष वेधून घेतले.
बसव जयंती विशेष

कलबुर्गी येथील बसव जयंती मिरवणुकीत सोलापूरच्या जागतीक लिंगायत महासभा महीला शाखेच्या सदस्यांनी शरणांच्य वचनावर सादर केलेल्या लेझीम नृत्याने लक्ष वेधून घेतले.

कलबुर्गी येथे शनिवारी बसव जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सोलापूरच्या जागतीक लिंगायत महासभा महीला शाखेच्या सदस्यांना बसवांनांचे प्रतिमा देवून सत्कार करण्यात आले.

महिलांच्या लेझीम नृत्याने लक्ष वेधून घेतले

सोलापूर

बसव जयंती निमित्त कलबुर्गी लिंगायत महासभा, सर्व लिंगायत व बसव समर्थक संघटनांनी बसवण्णा मुर्ती मिरवणूक काढली, लिंगायत महासभा सोलापूर महिला शाखे च्या सदस्यांनी बसवण्णा , सिद्धाराम या शरणाच्या वचनावर लेझीम नृत्य करून लक्ष वेधून घेतले.
कलबुर्गीतील नेहरूगंज भागात शनिवारी सायंकाळी धुत्तरगाव-उस्तुरी येथील कोरेनेश्वर महास्वामींनी मिरवणूकी चे उद्घाटन केलें. तेथून निघालेल्या मिरवणुकीत महिला संघाच्या अध्यक्षा राजश्री थळंगे यांच्या नेतृत्वाखाली पारंपारिक इरकल साडी परिधान केलेल्या 14 महिला सदस्यांच्या चमूने कपाळावर विभूती लावून एका रांगेत उभे राहून विविध शैलीत नृत्य केले. शिवयोगी सिद्धराम आणि बसवण्णा यांचे वचनावर नृत्य केल्याने सर्वांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिले.त्यांनी मिरवणुकीत नेहरू गंज ते जगत् वृत्त पर्यंत नृत्य करून लक्ष वेधून घेतले.
या बद्द्ल या कार्यक्रमात जागतीक लिंगायत महासभा कलबुर्गी यांच्या वतीने बसवण्णा यांचे भावचित्र देऊन महिलांचा गौरव करण्यात आला.
राजश्री थलंगे, मीनाक्षी बागलकोटे, सविता गोगवा, कविता हलकुडे, शीला बागलकोटे, शोभा धनशेट्टी आशा चडचाणकार, सहाना किणगी, रेश्मा भंटनुर, सुनंदा मोटगी, विजयालक्ष्मी बिज्जरगी, जगदेवी बिज्जरगी, चिन्नम्मा बिज्जरगी, चिन्नम्मा बिज्जरगी, सृष्टी होते.
