सी. बी. खेडगी कॉलेजचा बारावी निकाल ९२.५९ टक्के / साक्षी पवार हिने ५३५ ( ८९.१७ टक्के ) गुण घेऊन प्रथम.
बारावी निकाल २०२४
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/05/FB_IMG_1716348953486-450x470.jpg)
सी. बी. खेडगी कॉलेजचा बारावी निकाल ९२.५९ टक्के /
साक्षी पवार हिने ५३५ ( ८९.१७ टक्के ) गुण घेऊन प्रथम.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
अक्कलकोट, दि. २१-
अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी. बी. खेडगी महाविद्यालयाचा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विभागाच्या वतीने फेब्रुवारी- मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ९२.५९ टक्के लागला आहे. विशेष म्हणजे महाविद्यालयात अकाऊंटींग अॅन्ड आॅफिस मॅनेजमेंट मधील विद्यार्थिनी साक्षी संजय पवार हिने ५३५ ( ८९.१७ टक्के ) गुण घेऊन प्रथम आली आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
यंदाच्या वर्षी बारावी परीक्षेसाठी एकुण ७१६ विद्यार्थ्यांनी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ६६३ विद्यार्थी- विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यामध्ये ४५ विशेष श्रेणीत, ४३८ प्रथम श्रेणीत, १७४ द्वितीय श्रेणीत आणि तृतीय श्रेणीत ६ विद्यार्थी-विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. विज्ञान शाखेचा निकाल ९८.३३ टक्के, कला शाखेचा ८०. ९५ टक्के, वाणिज्य शाखेचा ९५.२० टक्के आणि व्यवसाय शिक्षण विभागाचे १०० टक्के इतका लागला आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
*विज्ञान विभागातून*
प्रणाली तानाजी खराडे ( कॉम्प्युटर सायन्स) ५१६ गुण ८६ टक्के प्रथम, स्वाती सुधीर जवळगे ५०३ गुण ८३.८३ टक्के- द्वितीय, संकल्प श्रीमंत बुक्कानुरे ५०० गुण ८३.३३ टक्के- तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
*कला विभागातून*
दिव्या शिवाजी दसाडे ४९९ गुण ८३.१७ टक्के प्रथम, दर्शन संजय चव्हाण ४९६ गुण ८२.६७ टक्के- द्वितीय,
श्वेता दशरथ हरवाळकर ४९२ गुण ८२ टक्के- तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)
*वाणिज्य विभागातून*
संस्कृती दत्तात्रय शिंदे ५०७ गुण ८४.०५ टक्के प्रथम, सपना श्रीमंत वरवटे ५०० गुण ८३.३३ टक्के- द्वितीय, संस्कृती रविकांत सुतार ४९४ गुण ८२.३३ टक्के- तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
*व्यवसाय शिक्षण चा निकाल १०० टक्के*
तसेच केंद्र सरकारच्या + २ व्यवसाय शिक्षण विभागाचे निकाल १०० टक्के इतका लागला आहे.
यातील *इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी* मध्ये साहिल राजू शेख ४५६ गुण ७६ टक्के – प्रथम, शुभम किशोर टोणपे ४२४ गुण ७०.६७ टक्के- द्वितीय, मेघराज दत्तात्रेय जेवरगी ४२० गुण ७० टक्के- तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
*आॅटोमोबाईल्स डी टेक्नॉलॉजी* मध्ये अमरीश लक्ष्मण सोनकर ३७१ गुण ६१.८३ टक्के – प्रथम, समर्थ गुंडप्पा पुजारी ३६० गुण ६० टक्के- द्वितीय, बिरप्पा तोटप्पा धनगर ३५३ गुण ५८.८३ टक्के- तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
*अकाऊंटींग अॅन्ड आॅफिस मॅनेजमेंट* मध्ये साक्षी संजय पवार ५३५ गुण ८९.१७ टक्के – प्रथम, राधिका दीपक आलोणे ५१५ गुण ८५.८३ टक्के- द्वितीय, जयश्री यल्लप्पा बन्ने ५०३ गुण ८३.८३ टक्के- तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी नगराध्यक्षा शोभा खेडगी, संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, व्हाइस चेअरमन अशोक हारकुड, सेक्रेटरी सुभाष धरणे, संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. शिवराय आडवीतोट, उपप्राचार्य बसवराज चडचण, पर्यवेक्षिका वैदेही वैद्य व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.