दिड महिन्यांपूर्वी तंबाखू दिला नाही याचा राग मनात धरून एकावर कोयत्याने वार ; गुन्हा दाखल
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
वाकड ( प्रतिनिधी) : तंबाखू मागितली असता, दिली नाही याच्या राग मनात धरून तिघांनी एका तरुणावर कोयत्याने वार केले. ही घटना पिंपळे निलख येथे बुधवारी (दि.22) घडली आहे.याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात कृष्णाकुमार उपेंद्र पासवान (वय 21 रा. पिंपळे निळख) फिर्याद दिली आहे. यावरून शुभम मानमोडे (रा.पिंपळे निलख),संकेत थोरात (रा.वाकड) व त्याचा साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे दीड महिन्यापूर्वी तंबाखू दिली नाही याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केली. यावेळी संकेत याने कोयत्याने फिर्यादीच्या हातावर डोक्यावर वार केले.तसेच फिर्यादीनुसार दुचाकीचे नुकसान केले. यावरून सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)