Solapur Flood : सोलापूर जिल्ह्यातील पूर नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात… प्रती कुटुंब इतकी मदत 👇
सोलापूर / प्रतिनिधी (दयानंद गौडगांव) : सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाकडून पैसे येण्यास सुरुवात झाली आहे.
प्रती कुटुंब १० हजार रुपयांची रक्कम शासनाकडून नुकसानग्रस्तांना देण्यात येत आहेत. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ आणि करमाळा तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मंद्रुप आणि माढा अप्पर तहसीलदार कार्यक्षेत्रातील बाधितांच्या खात्यावर आज गुरुवार (दि. २) रोजी जमा होणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीकाठच्या गावांना महापूराचा मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टी आणि महापूरातील बाधितांचा पंचनामा जिल्हा प्रशासनाने पूर्ण केला आहे. प्रती कुटुंब १० हजार रुपये याप्रमाणे ९८७७ जणांना ९ कोटी ९१ लाख ६० हजार रुपये शासनाकडून मदत जाहीर केली गेली आहे.