गावगाथा

प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथात साडेतीन शक्तीपीठांचा समावेश; दिल्लीत अवतरणार वणीची सप्तश्रृंगी देवी

चित्ररथ यंदा 'साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर' यावर साकारण्यात येणार आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथात साडेतीन शक्तीपीठांचा समावेश; दिल्लीत अवतरणार वणीची सप्तश्रृंगी देवी
वणीच्या सप्तश्रृंगी देवीचा प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथात समावेश असणार आहे.

यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा (Maharashtra News) चित्ररथ यंदा ‘साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’ यावर साकारण्यात येणार आहे. यामध्ये लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वणीच्या सप्तश्रृंगी देवीचा (Saptshrungi Devi) चित्ररथात समावेश असणार आहे.

26 जानेवारी निमित्त प्रजासत्ताक दिनी दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या पथसंचलनाकडे देशवासीयांचे लक्ष लागलेले असते. पथसंचलनात सहभागी होणारे राज्य आणि मंत्रालये आपापल्या परीने उत्तमोत्तम संकल्पना निवडतात आणि कलाकार त्या संकल्पनांना मूर्त रूप देऊन, हुबेहूब साकारून पाहणाऱ्यांना मंत्रमुग्ध करतात. महाराष्ट्राच्या चित्ररथासाठी ‘साडेतीन शक्तिपीठे स्त्रीशक्ती जागर’ या संकल्पनेची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यात महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन दर्शन यावेळी सर्व देशवासीयांना शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. प्रजासत्ताकदिनी कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, दिल्लीत कर्तव्यपथावर होणाऱ्या तुळजाभवानीचे श्रीक्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तश्रृंगी देवीची प्रतिकृती या चित्ररथात असणार आहे. त्यामुळे 26 जानेवारीच्या पथसंचलनाकडे देशवासीयांचे लक्ष लागले आहे.
या वर्षीची संकल्पना, रेखाचित्रे आणि त्रिमितीय प्रतिकृती तुषार प्रधान आणि रोशन इंगोले या युवक मूर्तिकार आणि कलादिग्दर्शक यांनी तयार केली आहे. त्यांच्यासोबत ‘शुभ एड’ चे संचालक नरेश चरडे आणि पंकज इंगळे हे भव्य प्रतिकृतीचे काम सांभाळत आहेत. 30 जणांचा समावेश असलेल्या, युवक मूर्तिकार आणि कलाकारांच्या टीमला घेऊन राहुल धनसरे मेहनत घेऊन 26 जानेवारीपर्यंत महाराष्ट्राचा चित्ररथ परिपूर्ण करण्याचे काम करत आहेत. सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिव विकास खारगे आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे आणि सहकारी यांच्या सहकार्याने हा चित्ररथ पूर्णत्वास येत आहे.

सप्तशृंगी, रेणुकादेवी, महालक्ष्मी यांच्या प्रतिकृती…
महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. या साडेतीन शक्तिपीठांमध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचे श्रीक्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी आणि (Nashik) वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. त्यामुळे या देवींच्या भव्य आणि तितक्याच सुंदर प्रतिमांचे आणि त्यांच्या माध्यमातून स्त्री सामर्थ्याचे दर्शन यानिमित्ताने सर्व देशवासीयांना घरबसल्या होणार आहे. सध्या चित्ररथाचे काम नवी दिल्ली येथे युद्धपातळीवर सुरू आहे.

वणीच्या सप्तश्रृंगीचा समावेश…
दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांनी राजनाथ सिंह यांच्याशी थेट संवाद साधत सप्तशृंगी देवीचा प्रतिकृतीचा महाराष्ट्राच्या चित्ररथाचा समावेश व्हावा यासाठी मागणी केली होती. त्यानुसार आता प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथात साडे तीन शक्ती पीठाचा समावेश होणार आहे. या माध्यमातून स्त्री सामर्थ्याचे दर्शन घडविले जाणार असल्याचे मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button