ठळक बातम्यागावगाथा

Dehuroad : प्रवासी महिलेचे विनयभंग केल्याप्रकरणी कॅब चालकाला अटक

निगडी (प्रतिनिधी): कॅबमध्ये बसलेल्या प्रवासी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका कॅब चालकाला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 14 मे रोजी देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. त्यानंतर आरोपी आपले अस्तित्व लपवून फिरत होता. 

राहुल पांडुरंग म्हस्के (रा. थेरगांव) असे अटक केलेले आरोपीचे नाव आहे.

पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 मे रोजी एक महिला कोरेगाव पार्क येथे तिच्या मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी जात होती. महिलेने कॅब बुक केली. त्यानंतर महिला राहुल याच्या कॅब (MH 14/LB4133) मधून कोरेगाव पार्क येथे जात होती. राहुल याने कार कोरेगाव पार्क येथे न नेता देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणली. तिथे त्याने महिलेच्या एकटेपणाचा फायदा उचलून महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. याबाबत महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

गुन्हा दाखल झाल्यापासून कॅब चालक राहुल हा आपले अस्तित्व लपवून पुणे शहरात वावरत होता. त्याच्याबाबत कोणती माहिती नसताना देहूरोड पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा शोध घेत त्याला अटक केली. या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी त्याची कार देखील जप्त केली आहे.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजयकुमार राठोड, पी टी खणसे, पोलीस अंमलदार प्रशांत पवार, बाळासाहेब विधाते, संतोष जाधव, सुनील यादव, किशोर परदेशी, प्रशांत माळी, केतन कानगुडे, संतोष महाडिक, निलेश जाधव, मोहसीन अत्तार, युवराज माने, शुभम बावनकर, स्वप्निल साबळे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button