Akkalkot : कल्याणशेट्टी विद्यालयात यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार


अक्कलकोट: सौ.सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक मराठी,सेमी व कन्नड माध्यम विद्यालयाचा मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या बोर्ड परीक्षेस एकूण 78 विद्यार्थी बसले होते. पैकी 77 उत्तीर्ण होऊन 98.71% निकाल लागला आहे. यात 90% पेक्षा जास्त 6 विद्यार्थी असून 75 % पेक्षा जास्त 37 विद्यार्थी आहेत. कु. प्रतिक्षा सोलनकर ही 92.80% गुण मिळवून प्रशालेत प्रथम आली आहे. कु.स्फूर्ती खराडे ही 92.60% गुण मिळवून द्वितीय आली, तर कु.लक्ष्मी चिकमळी ही 91.60% गुण मिळवून प्रशालेत तिसरी आली आहे. यावर्षीही गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी यानी कौतुक करून अभिनंदन केले आहे.

निकालानंतर यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक सर्व शिक्षकांचे संचालक मल्लीनाथ कल्याणशेट्टी, संचालिका शांभवी कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पेढा भरवून सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक मल्लिकार्जुन मसुती, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख पूनम कोकळगी, सेमी विभाग प्रमुख रूपाली शहा, अशोक येणगुरे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी यांनी उपस्थित होते.

सूत्रसंचलन जेष्ठ शिक्षक खंडेराव घाटगे यानी केले..