गावगाथा

मुले एकमेकांच्या संगतीने शिकतात याचाच वापर करत विद्यार्थ्यांना मेंटाँरींग ची जबाबदारी देऊन ग्रामीण भागात सुट्टीच्या काळात मोफत करिअर पोषक राबवलेले तब्बल १४ उपक्रम निश्चितच कौतुकास्पद : योगेश कबाडे 

चप्पळगांव येथील ग्रामीण विद्या विकास विद्यालय चप्पळगांव येथे वासंतिक नवोपक्रम उपक्रम समारोप

मुले एकमेकांच्या संगतीने शिकतात याचाच वापर करत विद्यार्थ्यांना मेंटाँरींग ची जबाबदारी देऊन ग्रामीण भागात सुट्टीच्या काळात मोफत करिअर पोषक राबवलेले तब्बल १४ उपक्रम निश्चितच कौतुकास्पद : योगेश कबाडे 

प्रतिनिधी l अक्कलकोट

मुले एकमेकांच्या संगतीने शिकतात याचाच वापर करत विद्यार्थ्यांना मेंटाँरींग ची जबाबदारी देऊन ग्रामीण भागात सुट्टीच्या काळात मोफत करिअर पोषक राबवलेले तब्बल १४ उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन योगेश कबाडे यांनी केले.चप्पळगांव येथील ग्रामीण विद्या विकास विद्यालय चप्पळगांव येथे वासंतिक नवोपक्रम उपक्रम समारोप गुरूवारी सकाळी पार पडले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रामाच्या अध्यक्षस्थानी बसवराज माळी हे होते. त्याप्रसंगी व्यासपीठावर प्रशालेचे पर्यवेक्षक संजय माने, योगेश कबाडे, संयोजक निलकंठेश्वर पाटील, स्वप्नील बणजगोळ, तेजश्री गोविंदे आदीची प्रमुख उपस्थित होती.
चप्पळगांव सारख्या ग्रामीण भागात अँबेकस, वेदिक गणित, ब्युटी पार्लर, स्पोकन इंग्लिश, सुलेखन, संगणक हार्डवेअर, स्फाँटवेअर, क्राफ्ट, चित्रकला, मेहंदीदी, फेटा बांधणे, कागदकाम, कोडिंग असे चौदा उपक्रम मोफत १६ एप्रिल ते ३० मे पर्यंत दरम्यान सकाळी ८ ते साडेअकरा पर्यंत घेण्यात आले. त्याचा समारोप ३० मे ला करण्यात आला. मेटाँर झालेले ४३ विद्यार्थीनी जवळ जवळ ६०० पेक्षा जास्त विद्यार्थी विद्यार्थ्यांनीनी या काळात तयार केले. या उपक्रमास चप्पळगांव शाळेसह परिसरातील अनंत चैतन्य, दहिटणे, खेडगी, मंगरूळे, आय एम एस, पुणे, अणदुर, आदीसह विविध शाळेतील विद्यार्थी विद्यार्थ्थीनी उपस्थित होते. स्वागत व प्रास्तविक श्रावणी हेगडे तर परिचय भक्ती बोधले हिने केले. सुत्रसंचालन अर्पणा जाधव, कृष्णा माळी यांनी तर आभार प्रणव पाटील यांनी मानले. यावेळी मनोगत शर्वरी नारंगकर, भाग्यलक्ष्मी नारंगकर, ईशा कोरे, शंकर माळी,प्रणाली सपकाळे, ऐश्वर्या व्हनमाने, वैष्णवी सुरवसे, श्रेया पाटील, स्वामिनी दसले, दीक्षाभुमी गजधाने, श्रीशैल हुल्ले, अमृता दसाडे यांनी आपले अनुभव कथन केले. फेटा प्रशिक्षक स्वप्नील बणजगोळ, ब्युटिपार्लर तेजश्री गोविंदे, मेहंदी व रांगोळी मंजुश्री पाटील, सुलेखन मल्लिनाथ माणकोजी, चित्रकला, कागदकाम व क्राफ्ट हणमंतु व्यंन्यालोलु, इंग्रजी स्पोकन निलकंठेश्वर पाटील, वेदिक गणित सुजाता उडचाण, अँबेकस चंद्रशेखर फताटे, हाँडवेअर आणि स्फाटवेअर मुलांतील मेंटाँर व कोडिंग प्रणव पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ज्ञानेश्वर कदम, राजशेखर विजापूरे, जगदीश मदने, मल्लिनाथ पाटील, यशवंत दुलंगे, भिमण्णा म्हेत्रे, नागनाथ सपकाळे, मिनाक्षी हेगडे, प्रगती हेगडे, युवराज जाधव, देविदास राजेगांवकर, पुण्यशाली कोरे आदीसह पालक, शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

चौकट – १) कार्यक्रमाचे अध्यक्ष बसवराज माळी- ज्ञानासोबत नितिमत्ता ही महत्त्वाचा आहे. नितीमत्ता आपणाला माणुस म्हणुन कसे जगायचे याला दिशा देते.
चौकट २) निलकंठेश्वर पाटील सीईओ ग्रामीण विद्या विकास विद्यालय चप्पळगांव- शिक्षण हे समाज बदलण्याचे एकमेव साधन आहे या तत्वांनी मोबाईल तंत्रज्ञानाचा उपयोग चांगल्या साठीही करता येतो. हे विद्यार्थ्यांमध्ये हे बिंबवणे ही जिद्द बाळगुन हे उपक्रम राबविले. भविष्यात रोबोटिक्स, चेस, संगीत, गायन, स्पोर्टस समुपदेशन, क्रीडा मानपपोचार तज्ञ्ज, नियमित समुपदेशन सुरु करण्यात येणार आहे. स्लो लर्नरला आयसीटीचा माध्यमातून सक्षम केले जाणार आहे.
चौकट २) गीता वाले फेटा बांधणे मेंटाँर-फेटा बांधायला शिकले. इतर सर्वांना शिकविले.शिकवताना आनंद वाटला.

चौकट ३) प्रशालेला बेस्ट टीम अँवार्ड – पी.ए.इनामदार यांचे आझम कँम्पस पुणे येथे ४० विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी गेले होते. हाँर्डवेअर प्रक्षिणक दिले होते. ३० संगणक संच शाळेला भेट दिले. रोबोटिक्स स्पर्धेत बेस्ट टीम अँवार्ड मिळाले आहे.
चौकट ४) रविकांत पाटील अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळ चप्पळगांव- ग्रामीण भागात असुनही प्रशाला विद्यार्थ्यांच्या हितासाठी वेगवेगळे उपक्रम राबवित असते. दिवाळी व उन्हाळी या दोन्ही सुट्टीसह नियमितही अनेक उपक्रम राबविले जातात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button