
*सर्व समाजांना न्याय देणारी वळसंगची श्री रामलिंग चौडेश्वरी देवीची यात्रा…!*


✍🏻-शब्दांकन पत्रकार:-
सैय्यदअल्ताफ महेबब पटेल.

दक्षिण सोलापुर तालुक्यातील वळसंग येथील ग्रामदैवत असलेल्या श्री रामलिंग चौड़ेश्वरी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरा होत असते. या जत्रेला ऐतिहासिक महत्व असून त्याला एक वेगळ्याच पद्धतिचे धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक स्वरूप त्याकाळी देण्यात आले आहे.
या यात्रेला सर्व धर्म व समाजातील लोकाना न्याय देणारी आणि राष्ट्रीय एकात्मता जपणारी यात्रा म्हणून लौकिक प्राप्त झाले आहे.
करनाटक व महाराष्ट्र या दोन राज्याच्या सीमावर्ती भागातील वळसंग गावात आज पासून सुमारे दोनशे वर्षा वर्षा पूर्वी वीर नावाच्या एका मुलाने करनाटक राज्यातील माशाळ या गावातील मंदिरातून सध्याचे संपूर्ण यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेले बाळाबटल म्हणजेच चांदीची वाटी हि पळवून आणली अशी आख्यायिका आहे. ही वाटी आणत असतांना विरच्या जीवावर बेतले हे बाळ बट्टल म्हणजेच माशाळ गावचे वैभव मानले जात असे.
कारण हे बाळ बट्टल म्हणजे गावचे सुरक्षा कवच ज्या गावात हे बाळ बट्टल राहील त्या गावात कोणतीही नैसर्गि आपत्ती गावची वेस ओलांडू शकत नाही हे ह्या बाळ बट्टल चे महत्व.
माशाळ गावातून वीर ने ज्यावेळी बाळ बट्टल पळविला तेंव्हा त्या बाळ बट्टलच्या संरक्षणासाठी विरचा पाठलाग करण्यात आला परंतू वीर त्यांच्या हातात येऊ शकला नाही. संपूर्ण रात्र पायी तुडवत विरने कसे बसे वळसंग गाव गाठले त्यावेळी वळसंग गावच्या संरक्षणासाठी गावच्या चारही बाजूनी बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंती होत्या त्यामुळे वीरला गावात प्रवेश मिळाला नाही.गावात प्रवेश करण्यासाठी असणाऱ्या वेशीतील प्रमुख द्वारावर येऊन विरने द्वारपाल (रामोशीला)द्वार उघडण्याची विनंती केली परन्तु रात्रीच्या वेळी वेशीचे द्वार उघडण्यास मनाई असल्याने द्वारपालाने विरसाठी द्वार उघडले नाही त्यामुळे वीरने बाळबट्टल द्वाराच्या छोट्याश्या कमानीतून आत फेकून दिला आणि माशळ येथून पाठलाग करीत आलेल्या लोकांपासून स्वतः चा जीव वाचवण्यासाठी दिंडुर गावच्या दिशेने पळ काढला तोपर्यंत त्याचा पाठलाग करणाऱ्या मारेकऱ्यानी त्याला अर्ध्यातच गाठून त्याचे शीर धडावेगळे केले परंतु बाळ बट्टल कांही त्यांच्या हाती न लागल्याने त्यांनी वीरचे शीर कलम करून माशाळला न्हेले.
आज ही दिंडुर रस्त्यावर वीरची समाधी आहे.
इकडे वळसंग गावात सकाळ होताच विरने आत फेकलेले बाळ बट्टल (चांदीची वाटी)
द्वारपाल (रामोशी) ने गावचे
पाटील
माझे पणजोबा सैय्यदक़ुतुबउद्दीन पटेल यांचे वडील सैय्यदअलिसाहब पटेल त्यांचे वडील सैय्यदमोहियोद्दीसाहब पटेल हे वळसंग गांवचे पोलीस पाटील
सय्यदमोहियोद्दीन साहब पटेल यांच्या पाटील वाड्यात आणून सुपूर्द केला. त्यानंतर सदर चांदीच्या वाटीची सखोल चौकशी केल्यानंतर ते कर्नाटकातील माशाळ गावावरून वीरने पळऊन आणल्याचे निष्पन्न झाले नंतर पाटलांनी गावातील सर्व समाजातील व्यक्तींना आपल्या पाटील वाड्यावर बोलावून घेतले आणि सदर बाळ बट्टलचे गावातील हटगार(कोष्टी) समाजाच्या निगराणी खाली असणाऱ्या श्री रामलिंग चौडेश्वरी देवस्थान समितीच्या विश्वस्थानच्या विधिवत सुपूर्द केले. तत्पूर्वी सैय्यद मोहियोद्दीन पाटील यांनी ओटी भरून वाड्यापासून ते चौडेश्वरी देवीच्या मंदिरा पर्यंत सवाद्य मिरवणूक काढून सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला तो वारसा आजतागायत अखंडपणे सुरू आहे.
आजही आपले हरवलेले वैभव आणि माशाळ गावची प्रतिष्ठा परत न्हेण्यासाठी माशाळ गावचे लोक हे बाळबट्टल वळसंगहुन माशाळला परत न्हेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असतात म्हणून रुद्र अवतार धारण करणारी चौडेश्वरी देवी आजही सैय्यद मोहियोद्दीन पटेल यांचे वंशज असलेले या यात्रेचे प्रमुख मानकरी यांच्या वचना शिवाय गावची वेस ओलांडत नाही. ज्यावेळी देवी पाटलांकडून वचन घेत असते तो क्षण डोळ्याचे पारणे फेडणारा असतो कारण गावचे पाटील शेकडो तलवारिंच्या साक्षने कोणत्या ही परिस्थितीत गावची प्रतिष्ठा आणि वैभव गावातून गावाबाहेर जाऊ न देण्याचे अभिवचन देवी ला यावेळी देतात त्यांच्या ह्या अभिवचनाला पूर्ण करण्यासाठी गावातील सर्व समाजातील तरुण वर्ग मोठ्या उत्साहाने आपल्या हातात तलवार भाले आणि कुऱ्हाड घेऊन बाळबट्टलच्या चोही बाजूने संरक्षण देण्याचं काम शौर्याने करतात.त्यानंतर याच परिस्थितीत बाळबट्टल संपूर्ण गावची प्रदक्षणा पूर्ण करत वेशीतून गावात प्रवेश करते. त्यानंतर पाटलांनी दिलेल्या वचनाची पूर्तता झाल्याने पटालांचे आभार मानण्यासाठी ज्या वाड्यातुन देवीची ओटी भरून मंदिराच्या विश्वस्थानना सुपूर्द करण्यात आले होते अगदी तीच परंपरा कायम ठेवत पाटील वाड्याच्या उंबरठ्यावर नतमस्तक होते आणि मंदिरकाकडे प्रस्थान करते. वळसंग गावचे सर्वेसर्वा आणि पाटील असणाऱ्या सैय्यदमोहियोद्दीनसाहब पटेल यांनी दूरदृष्टी ठेवत गावातील सर्व स्थरातील आणि जातीधर्मातील लोकांना एकत्रित करून चौडेश्वरी मंदिर समितीसह मुस्लिम समाज, कोष्टी समाज, माळी समाज,तेली समाज, मातंग समाज, ढोर समाज,बौद्ध समाज, नाभिक समाज, सुतार समाज, कुंभार समाज, चर्मकार समाज यासर्व समाजातील लोकांना यात्रेत वेगवेगळ्या प्रकारे मानकरी म्हणून नेमून सर्व समाजातील लोकांना न्याय देण्यात आला आहे म्हणून या श्री रामलिंग चौडेश्वरी देवीच्या (बाळ बट्टल) यात्रेला सर्व समाजाला न्याय देणारी यात्रा म्हणून ओळखले जाते.

टीप-वरील घटनेचे सर्व कागदोपत्री पुरावे मराठी,मोडी आणि उर्दू भाषेत माझ्याकडे उपलब्ध आहेत.अधिक माहितीसाठी माझ्याशी संपर्क करावा.
मो- 8180060031
8847746263
*✍🏻शब्दांकन पत्रकार:- सैय्यदअल्ताफ़ महेबुब पटेल.*
