श्री वटवृक्ष स्वामी समर्थांमुळे अक्कलकोटचे नाव सातासमुद्रापार – माजी आमदार किरण पावसकर यांचे प्रतिपादन
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
अक्कलकोट (प्रतिनिधी) दि.३१ , येथील अक्कलकोट निवासी श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान आहे. याच वटवृक्षाखाली स्वामी समर्थांनी सलग २२ वर्षे बसून आपल्या अवतार कार्याची व्याख्या जगाला दाखवून दिली. मुंबई व श्रीस्वामी समर्थांचे नाते अतूट आहे. म्हणूनच आज संपूर्ण भारतामध्ये मुंबईत स्वामी भक्तांची संख्या जास्त आहे. श्री स्वामी समर्थांची ही कृपादृष्टी मुंबईतील स्वामी भक्तांवर नेहमीच होत असते. तसेच मुंबईतील अनेक स्वामी भक्त आज परदेशात स्थायिक आहेत. स्वामी समर्थांच्या या कृपादृष्टीमुळे मुंबईतील व परदेशातील स्वामीभक्त धन्य आहेत, म्हणून श्री स्वामी समर्थांमुळेच श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे व अक्कलकोटचे नाव सातासमुद्रापार पोहोचले असल्याचे प्रतिपादन मुंबईतील माजी आमदार किरण पावसकर यांनी केले.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी किरण पावसकर यांचा श्री स्वामी समर्थांचे
कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी पावसकर बोलत होते. यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी, प्रसाद सोनार, चंद्रकांत सोनटक्के, चित्तरंजन अगरथडे, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार, सागर गोंडाळ, विपुल जाधव, श्रीकांत मलवे आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)