Akkalkot : चपळगाव विद्यालयाचे प्राचार्य श्री.शिवबाळ मुली सर व श्री.रमेश कत्ते सर सेवानिवृत्त
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
चपळगाव, (दि.३१), ग्रामीण विद्या विकास विद्यालय, चपळगाव प्रशालेत आज 31 मे रोजी प्राचार्य श्री. शिवबाळ मुली सर(30 वर्षे सेवा)व तांत्रिक शिक्षण विषय शिक्षक श्री. रमेश कत्ते सर(41वर्षे सेवा) हे प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
यावेळी मुली सर व कत्ते सर यांचे सेवापुर्ती निमित्त संस्थेकडून सचिव श्री. प्रभाकर हंजगे सर व कार्याध्यक्ष श्री. पंडित पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
प्राचार्य मुली सर हे 05 वर्षे पर्यवेक्षक पदी आणि 05 वर्षे प्राचार्य पदी सेवा बजावली.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)
मराठी विषय अध्यापन करताना विध्यार्थ्यांना समजेल अश्या सहज व सोप्या पद्धतीने शिकवण्याची त्यांची हातोटी होती.आपले कर्तव्य प्रामाणिकपणाने पार पाडून अनेक अडचणींना तोंड देऊन त्यातून मार्ग काढत आपले बहुमोल योगदान दिले.
मराठीविषयाबद्दल खोल ज्ञान आणि गोडी व विध्यार्थीप्रियता हे विशेष गुण त्यांच्यामध्ये होते.
आपल्या मनोगतात प्राचार्य मुली सरांनी सांगितले की, माजी आमदार स्व.इनायतअली पटेल (काका ), प्राचार्य स्व.पी.वाय. पाटील आणि स्व.शंकरराव हंजगे साहेब यांचे मार्गदर्शन,शिकवण व संस्कार* *यामुळे आज मला महाराष्ट्रातील या प्रसिद्ध अशा शाळेत सेवा करण्याचे भाग्य लाभले आहे.
माझी जन्मभूमी पान मंगरूळ आहे तर कर्मभूमी चपळगाव व ही प्रशाला आहे.विध्यार्थीरुपी शिदोरी मला उर्वरित आयुष्यासाठी भरपूर मिळालेली आहे व मी सर्वसंपन्न आहे.
आज सेवापूर्ती निमित्त मी श्री मल्लिकार्जुन चरणी प्रार्थना करतो की,या प्रशालेचे कार्य आणखी वाढत राहो.मी सर्वांचे मनःपूर्वक ऋणी आहे.
श्री. रमेश कत्ते सरांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, “मी 41 वर्षे सेवा करताना सर्वांचे सहकार्य मला लाभले.अनेक चांगले अनुभव मिळाले.
सध्या शिक्षण क्षेत्रात नवीन बदल घडत आहेत त्याप्रमाणे आपली शाळा अद्ययावत होत आहे. डिजिटल क्लास रूम, संगणक शिक्षण, सेमी इंग्लिश शिक्षण इत्यादी….
आणि सध्याचे संस्था अध्यक्ष आदरणीय श्री. रविकांत पाटील साहेब व संस्था सर्व सन्माननीय पदाधिकारी गुरुजनसोबत हे बदल घडवत आहेत.
प्रशाला व गुरुजन वर्ग नेहमी गुणवत्तापूर्ण विध्यार्थी घडवण्यासाठी कटीबद्ध आहेत हे खूप कौतुकस्पद आहे.
मी सर्वांचे आभारी आहे.
यावेळी नवनियुक्त प्राचार्य श्री.संजय माने सर व पर्यवेक्षक श्री. विश्वनाथ बानेगाव सर यांचे सत्कार संस्था संचालक मल्लिकार्जुन पाटील, सिद्धाप्पा मामा म्हमाणे व काशिनाथ उटगे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
याप्रसंगी सचिव श्री. हंजगे सरांनी संस्थेकडून प्राचार्य मुली सर व कत्ते सरांना उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा दिले , तसेच श्री.प्राचार्य माने सर व पर्यवेक्षक श्री. बानेगाव सरांचे अभिनंदन केले नवीन पद व कार्यास शुभेच्छा दिले.
यावेळी संचालक गुलाब बानेगाव, मनोज नाना इंगुले,CEO नीलकंठ पाटील सर,सर्व गुरुजन वर्ग आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.