गावगाथा

*शिंपी समाजाचा वधूवर मेळावा संपन्न*

२१ जून अखेर नोंदणी सुरूच राहणार :- संदिप लचके

 

*शिंपी समाजाचा वधूवर मेळावा संपन्न*

२१ जून अखेर नोंदणी सुरूच राहणार :- संदिप लचके

पुणे:- सातारा रोड वरील वाळवेकर लाँन्स येथे नामदेव समाजोन्नती परिषद पुणे शहर शाखेचा शिंपी समाजातील सर्व पोटजातीचा राज्यस्तरीय वधूवर मेळावा नुकताच भव्य स्वरूपात संपन्न झाला. यावेळी जवळपास ५०० पेक्षा जास्त वधूवरांनी नोंदणी केली.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री राजेंद्र पोरे तर प्रमुख पाहुणे अपर जिल्हाधिकारी मा. श्री. अजित रेळेकर, मा नगरसेविका स्मिता वस्ते, उद्योजिका श्रीमती सुनिता पाटसकर, उद्योजक संतोष हाबडे, समीर कोपर्डे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मनोज मांढरे, प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर या सर्व प्रमुख पाहुणेच्या हस्ते श्री नामदेव महाराजांचे मुर्ती पुजन व दिप प्रज्वलन करून स्व. कै. तु. पां. मिरजकर, स्व. कै. संजीव तुपसाखरे, स्व. कै. नि. ना. रेळेकर यांच्या प्रतिमेची सुद्धा पुजा करण्यात आली.

यावेळी समाज सेवक मा. श्री. रमेश हिरवे यांना सामाजिक कार्याच्या योगदानाबद्दल “जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार” तर श्रीमती सुनिता पाटसकर यांना “यशस्वी उद्योजिका पुरस्कार” हा पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर शैक्षणिक क्षेत्रात विशेष नैपुण्य मिळवल्याबद्दल डाॅ. आकांक्षा स्वप्निल खुर्द, चि. अथर्व प्रशांत सातपुते, कु. आकांक्षा प्रशांत भोंडवे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला.

यावेळी कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. रविंद्र धंगेकर, मा. नगरसेवक विनोद वस्ते, केशवराज संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर, पुणे विभागीय उपाध्यक्ष कोल्हापूर, विभागीय उपाध्यक्ष राजन उरूणकर, सुभाष भांबुरे, बाळासाहेब काकडे, विश्वस्त वसंतराव खुर्द, अॅड. अनिल कोपर्डे, नामदेव महिला परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती आशाताई वेल्हाळ, ना.स.प. पुणे जिल्हाध्यक्ष विजय कालेकर, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष कैलास नेवासकर, सचिव सौ. रेखा गाडेकर, अहमदनगर जिल्हाध्यक्ष शैलेश धोकटे,अहमदनगर ग्रामीण अध्यक्ष अरविंद गुजर, दिंगबर क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती बरोबर पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील ज्ञातीसंस्थाचे अध्यक्ष, पदाधिकारी, समाजबांधव तसेच महाराष्ट्रातील बहुसंख्य जिल्ह्यातील हजारो समाजबांधव उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वश्री सुभाष मुळे, प्रदिप खोले, प्रशांत सातपुते, कुंदन गोरटे, सोमनाथ मेटे, अक्षय मांढरे, शिवाजी माळवदकर, स्वप्निल खुर्द, राहुल सुपेकर, प्रशांत भोंडवे, निकीता पांढरकामे, अक्षय लचके, चिन्मय निमकर, अक्षय पांढरकामे या प्रमुख पदाधिकारीसह ना.स.प पुणे शहर शाखेच्या सर्वच महिलांनी विशेष सहकार्य केले.

यावेळी प्रशांत सातपुते यांचे सुस्पष्ट व आपल्या खड्या आवाजात कार्यक्रमाची उंची गाठणारे निवेदकामुळे व दुर्गेश खुर्द यांची अतिशय उत्तम ध्वनी दृश्य व्यवस्थेमुळे कार्यक्रम अतिशय उत्तम नियोजनपूर्वक झाला. या वधूवर मेळाव्याची सुची एका महीन्यात उपलब्ध केली जाणार असून दि. २१ जून अखेर नोंदणी सुरूच राहील अशी माहिती अध्यक्ष संदिप लचके यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button