गावगाथा

सदलापूर येथे जगज्योती महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव निमित्त जंगी कुस्ती स्पर्धेचे उदघाटन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न…

कुस्ती स्पर्धा

सदलापूर येथे जगज्योती महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव निमित्त जंगी कुस्ती स्पर्धेचे उदघाटन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न…

HTML img Tag Simply Easy Learning    

*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*तालुक्यातील सदलापूर येथे जगज्योती महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव निमित्त जंगी कुस्ती स्पर्धेचे उदघाटन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.*

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि संकल्पनेतून जानेवारी २०२४ महिन्यापासून अक्कलकोट तालुक्यातील ७५ पैलवान सोलापूर, पुणे, कोल्हापूर, धाराशिव, छत्रपती संभाजी नगर येथे आहेत. अशा कुस्तीगीरासाठी प्रति महिना पैलवानासाठी आवश्यक असे तूप, बदाम, खारीक, बडीशेप,धने, खसखस, इलायची, इत्यादी पदार्थ दिले जाते या उपक्रमाचा अक्कलकोट तालुक्यातील पैलवानांनी लाभ घेऊन कुस्ती क्षेत्रात अक्कलकोट तालुक्याचे नावं महाराष्ट्राभरात चमकवावे असे उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

याप्रसंगी अक्कलकोटचे विजय माने, अतिश पवार व कुस्ती अध्यक्ष पै.आकाश बनसोडे, सदलापुरची कन्या व महाराष्ट्र चॉम्पियन पै. धरती बनसोडे, पै.विकास बनसोडे, मल्लिकार्जुन मुलगे, शिवानंद पटणे, भिमाशंकर बंदिछोडे, मल्लिकार्जुन पाटील, बसवराज चीतले, उल्हास पाटील, अहमद जमादार, मल्लिनाथ पाटील, सोमनाथ पाटील, बसवराज बनसोडे, गुरुलिंगप्पा पाटील, अजय पाटील, अर्जुन पात्रे, लक्ष्मण गुद्देवाडी, जाफर जमादार, चंद्रकांत कुंभार, विश्वनाथ गायकवाड, दिलीप बनसोडे, काशिनाथ धूळशेट्टी, धुळप्पा बजे, विठ्ठल बनसोडे, देवेंद्र गायकवाड, खाजप्पा गायकवाड, महादेव बनसोडे, सतीश बनसोडे, तुकाराम व्हदलुरे, विजयकुमार मुलगे, बाबू बजे, सिद्दप्पा पाटील, लक्ष्मण पाटील, नरसप्पा पटणे हे उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

या स्पर्धेत रु. २१ हजार, रु.१५ हजार, रु.११ हजार, रु.७ हजार, रु.५ हजार तर शेवट कुस्ती सदलापुरची कन्या व महाराष्ट्र चॉम्पियन पै. धरती बनसोडे यांच्या कडून चांदीची गदा प्रधान करण्यात आली. या कुस्ती करिता वस्ताद म्हणून उप महाराष्ट्र केसरी पै.मौला शेख, पै.अण्णप्पा अचलेर,पै.महेश कुलकर्णी, पै.परमेश्वर शेळके, पै.हिरालाल सावंत, महाराष्ट्र चॉम्पियन पै.सुंदर जवळगे, पै.कमलाकर खरात यांनी काम पहिले. अक्कलकोट तालुक्यासह जिल्ह्यातील व धाराशिव जिल्ह्यातील पैलवानांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.

*⭕चौकट :*
*सार्थ ठरत आहे :*
महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा आहे. कुस्ती खेळाला अक्कलकोट तालुक्यात भरभराटीचे दिवस प्राप्त होत आहेत. याकरिता श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाने पुढाकार घेतल्याने प्रसादरूपी खुराक या योजनेचे योगदान सार्थ ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button