सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी कडून सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी प्रणितीताई शिंदे यांना देण्यात यावी अशी एकमताने मागणी
मुंबई येथील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बैठकीत,

*मुंबई येथील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बैठकीत, सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी कडून सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी प्रणितीताई शिंदे यांना देण्यात यावी अशी एकमताने मागणी करण्यात आली.*

मुंबई, दिनांक , 05 मार्च 2024

लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होणार असून, लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षेतेखाली माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वराज चव्हाण, यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसभा मतदारसंघनिहाय महत्वाची बैठक टिळक भवन दादर येथे आयोजित केले होते.
याबैठकिस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणितीताई शिंदे याही उपस्थित होत्या.

यावेळी सोलापूरच्या सध्याच्या राजकीय परिस्थिती विषयी चर्चा करण्यात आले आणि शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे आणि शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यानी एकमताने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी प्रणितीताई शिंदे यांना देण्यात यावी अशी मागणी केली.

सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, रामहरी रूपनर, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, माजी सभापती भीमाशंकर जमादार, प्रदेश चिटणीस नरसिंह आसादे, किसन मेकाले, अलकाताई राठोड, जिल्हा सरचिटणीस भीमराव बाळगे, भटक्या विमुक्त विभाग अध्यक्ष भारत जाधव, अनुसूचित जाती विभाग जिल्हा अध्यक्ष मयूर खरात, किसान काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष विजयकुमार हत्तूरे, प्रदेश प्रतिनिधी सुशील बंदपट्टे, मीडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला, संघटक रमेश हसापूरे, उपाध्यक्ष मल्लेशी बिडवे, राधाकृष्ण पाटील, अल्पसंख्याक विभागाचे रशीद शेख, प्रवक्ते काका कुलकर्णी, कय्युम बलोलखान, SK कांबळे, महमद शेख, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
