सध्या अक्कलकोट तालुक्याच्या विविध भागात पाऊस कोसळत असल्याने बासलेगांव भागातील शेतकरी पेरणीस सुरुवात
राज्याच्या सर्वच भागात हळूहळू मान्सून सक्रिय होत आहे. कोकणानंतर मान्सून आता मुंबईसह सोलापूर जिल्ह्यात दाखल झाला आहे. दि.१५ जूनपर्यंत राज्याच्या सर्व भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता

*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*राज्याच्या सर्वच भागात हळूहळू मान्सून सक्रिय होत आहे. कोकणानंतर मान्सून आता मुंबईसह सोलापूर जिल्ह्यात दाखल झाला आहे. दि.१५ जूनपर्यंत राज्याच्या सर्व भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवली जातेय. दरम्यान, सध्या अक्कलकोट तालुक्याच्या विविध भागात पाऊस कोसळत असल्याने बासलेगांव भागातील शेतकरी पेरणीस सुरुवात केलेली आहे.*

तालुक्यातील बासालेगांव परिसरात गेल्या दोन दिवसापासून पाऊस झाल्याने खरिपाच्या पेरणीला सुरुवात, शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. या गावातील शेतकरी सत्तारभाई शेख यांनी खरिपाच्या पेरणीला टँक्टरच्या माध्यमातून सुरुवात केलेली आहे. यांच्यासह परिसरातील महिबुब शेख, बसवराज देकाणे, नागनाथ बिराजदार, गंगाधर बासलेगावकर, रामण्णा भंडारे, संतोष संगपाळ यांनी देखील पेरणीची लगबग सुरू केली आहे.

*⭕चौकट :*
यंदा जोरदार पावसाची आशा..! :
अक्कलकोट हा आवर्षण दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात कोणतेही सिंचन योजना अद्यापही पूर्ण झालेले नांही. यामुळे शेतकरी आपल्या शेतात तालुक्यातल्या पाणी योजना ह्या मृगजळ ठरत असल्याने शेतकऱ्यांनी ज्या त्या भागातून आपली शेती ही चक्क सौर उर्जा प्रकल्पाला भाड्याने देऊन त्याच ठिकाणी मोलमजुरी करीत आहे. ही दुर्दैवी बाब आहे. बासालेगांव भागात देखील सौर उर्जा प्रकल्प येणार असल्याचे सांगितले जात आहे. आमच्याकडे असलेल्या बोटांवर मोजण्या इतकी शेती असून सध्या झालेल्या पाऊसावर व आगामी काळात जोरदार पाऊसाची आशा बाळगून खरीपाची पेरणी केली आहे.

-सत्तारभाई शेख, शेतकरी बासालेगांव

*⭕चौकट :*
*दुबार पेरणीची अडचण टाळण्यासाठी :*
पावसाअभावी शेतीची काम खोळंबली होती. त्या कामांना आता वेग आला आहे. दरम्यान, १०० मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, दुबार पेरणीची अडचण टाळण्यासाठीचा सल्ला तालुका कृषी भांडार संघटनेचे तालुकाध्यक्ष कृषिरत्न अप्पासाहेब तथा अप्पुकाका पाटील यांनी दिला आहे.
