अक्कलकोटचे सुपुत्र विक्रमवीर धानय्या कौटगीमठ ७२ वी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण !
शैक्षणिक बातमी

अक्कलकोटचे सुपुत्र विक्रमवीर धानय्या कौटगीमठ ७२ वी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण !

अक्कलकोट: येथील के एल ई मंगरुळे प्रशालेतील शिक्षक धानय्या कौटगीमठ सर ७२ वी टी एस टी ई टी परीक्षा२०२४ उत्तीर्ण झाले.


तेलंगणा राज्य शासन अनुमतीने राज्य शिक्षण विभाग मार्फत टी एस टी ई टी तेलंगाणा राज्य शिक्षक पात्रता परीक्षा२०२४ या वेळी ऑनलाइन पद्धतीने २४ मे २०२४ रोजी घेण्यात आला होता आणि याची निकाल आज १२ जून२०२४ रोजी जाहीर करण्यात आला.अवघ्या १९ दिवसात निकाल जाहीर करून पारदर्शकता आणि वेळे ची महत्त्व तेलंगाणा राज्य दाखवून दिलेत.

धानय्या कौटगीमठ सरांनी टी एस टी ई टी पेपर क्रमांक२ लिहले असून १५० पैकी १०१ गुण प्राप्त करून ६७.३३ टक्क्यांनी उत्तीर्ण झालेत. धानय्या सरांची ही सलगपणे ७२ वी परीक्षा उत्तीर्ण होण्याचा प्रवास सुरूच आहे.

देशातील विविध राज्यातील सेट नेट आणि टी ई टी उत्तीर्ण होऊन, मिळालेल्या ज्ञान चा ,अनुभवांची फायदा इतर विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने यूट्यूब मोफत मोफत मार्गदर्शन करीत आहे.आता पर्यंत६५५ विद्यार्थी सेट नेट टी ई टी आणि पेट परीक्षा उत्तीर्ण झालेत.