Solapur: जखमी सापाला यशस्वी उपचार करून सर्पमित्राने दिली जीवदान ; सर्पमित्र भिमसेन वर कौतुकांचा वर्षाव


सोलापुर : रात्री १०:१५ वाजण्याच्या दरम्यान विजापूर रोड परिसरातील पापाराम नगर येथील रोहित वाघमारे यांच्या राहत्या घराच्या कंपाउंड गेट मध्ये एक सर्प अडकल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अतुल नागटिळक यांनी निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटनेचे संस्थापक सर्पमित्र भीमसेन लोकरे यांना फोन कॉल द्वारे माहिती दिली.

माहिती मिळताच सर्पमित्र भीमसेन लोकरे व सहकारी सचिन कांबळे त्या ठिकाणी पोहचून पाहणी केली असता त्या ठिकाणी तस्कर जातीचा बिनविषारी सर्प जखमी अवस्थेत आढळून आला. जोरदार पाऊस सुरु असताना हा सर्प तेथील लोखंडी गेट च्या चाकामध्ये अडकून अत्यंत जखमी झाला होता. त्या सर्पास सर्पमित्र भीमसेन लोकरे यांनी सुरक्षित रित्या पकडले.

रात्रीची वेळ व तसेच मोठा पाऊस असल्याने त्या सर्पास उपचारासाठी सर्पमित्र भीमसेन लोकरे यांनी आपल्या स्वतःच्या घरी घेऊन गेले. सापाच्या पोटाजवळ चिमटा बसून मोठी जखम झाल्याने तो सर्प अत्यंत व्याकुळ अवस्थेत दिसत होता. त्या सापाची हालचालही मंदावली होती.

सर्पमित्र भीमसेन लोकरे व निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटनेचे अध्यक्ष सर्पमित्र रविचंद्र स्वामी यांनी बेटाडीन सोल्युशन आणि बँडेज च्या साहाय्याने सापाच्या जखमेवर व्यवस्थित पणे उपचार केले. निरीक्षणासाठी रात्री त्या सापास स्वतःजवळच ठेऊन सकाळी पाहणी केली असता
त्या सापाची जखम भरून आल्याचे निदर्शनास आले. जखमेवर मुंग्या लागूनये या साठी हळद लावण्यात आले.
काही वेळाने त्या सापाच्या हालचालीला वेग आला व तो सर्प तंदरुस्त होऊन वावरू लागला.
सर्पमित्रांनी केलेल्या उपचारामुळे तो सर्प खूपच खुश झाल्याचे दिसत होता.
त्या सर्पास सर्पमित्र भीमसेन लोकरे व सर्पमित्र रविचंद्र स्वामी यांनी सुखरूपपणे निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले.