Akkalkot : गटारी तुंबल्या, शौचालयाचे घाण पाणी रस्त्यावर , परिसरात दुर्गंधी ; अक्कलकोट नगरपरिषदेचं दुर्लक्ष

अक्कलकोट दि. 13, शहरातील मुख्य रस्त्यावर गटारीचे व शौचालयाचे घाण पाणी वाहात असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली असून पालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देऊन स्वच्छता ठेवावी अशी अपेक्षा येथील नागरिक करीत आहेत.

अक्कलकोटच्या एवन चौकातील भररस्त्यावर शौचालय व मुतारीचे घाण पाणी गेल्या 15 दिवसापासून वाहात असल्याने मोठी दुर्गंधी पसरली आहे याच भागात मोठी व्यापार संकुल आहे, अनेक दवाखाने आहेत, हाकेच्या अंतरावर मुख्य अक्कलकोट नगरपालिका कार्यालय आहे , हा भागात उच्च वर्गीय लोक राहतात तरी आरोग्य अधिकाऱ्यांलां ही दुरावस्था दिसत नाही कसे असा प्रश्न पडला आहे . या दुर्गंधी मुळे लोकांचे व स्वामी समर्थ भक्तांचे आरोग्य धोक्यात आले आहे .

सावरकर चौकातील बोळात गेल्या काही महिन्यांपासून सांडपाण्याची मोठी गटार कायमच तुंबलेली आहे या बाबत अनेकदा न. प. कडे तोंडी व लेखी तक्रार दिली आहे तरीही यावर उपाययोजना अद्याप झालेली नाही अशीच परिस्थिती शहराच्या बहुतेक भागात आहे , यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले असून तुंबलेल्या गटारी व साचलेला कचरा आणि सार्वजनिक शौचालये ताबडतोब स्वच्छता करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी येथील जनता करीत आहे.
