Akkalkot : वीरशैव माळी समाजातील अक्कलकोट शहर व तालुक्यातील गुणवंत यशस्वी विद्यार्थांचा सन्मान सत्कार म.नि.प्र.बसवलिंग महास्वामीजी व माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रें यांच्या उपस्थितीत संपन्न

अक्कलकोट (प्रतिनिधी): अक्कलकोट तालुका व शहरातील वीरशैव माळी समाजातील विविध स्पर्धा परिक्षा, दहावी व बारावी वी या महत्वपूर्ण परिक्षांमधील गुणवंत यशस्वी विद्यार्थांचा समाजातील प्रतिष्ठीत नागरिकांकडून कौतुक सन्मान व सत्कार करण्यात आले. यामध्ये समाजातील आदर्श यशस्वी व्यक्तीमत्व श्री राजेंद्र नावदगी, डीआरडीओ शास्त्रज्ञ बेंगळुरू व डाॅ संजीव फुलारी प्रमुख शरिरचना विभाग वैशंपायन वैद्यकीय विद्यालय सोलापुर यांचे मार्गदर्शन मनोगत लाभले.


तर याप्रसंगी अध्यक्ष म्हणुन अक्कलकोट विरक्त मठाचे म.नि.प्र,श्री बसवलिंग महास्वामी यांची तर प्रमुख पाहुणे म्हणुन महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची उपस्थिती होती.

तसेच व्यासपीठावर सभापती प्रथमेश म्हेत्रे,उद्योजक शेटेपा पराणे,डाॅ बसवराज चिणकेकर,डाॅ दिपमाला अडवितोटे,डाॅ,शिवलीला माळी यांच्या प्रमुख उपस्थिसह कार्यक्रमास वीरशैव माळी समाजातील नागरिक बंधु भगिनी यशस्वी विद्यार्थी व पालक मोठ्या बहुसंख्येत उपस्थित होते
