Akkalkot Rural : अनंत चैतन्य प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय हन्नूर येथे प्रवेशोत्सव उत्साहात

अक्कलकोट (प्रतिनिधी ): आज शनिवार दिनांक १५ जुन रोजी -महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य माध्यमिक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय तसेच सेमी इंग्रजी प्राथमिक विद्यालय हन्नूर येथे प्रवेशोत्सव उत्साही वातावरणात पार पडला. सन 2024-25 शैक्षणिक वर्षातील शाळेचा पहिला दिवस असल्याने नवा गणवेश, नवा वर्ग, नव- नवीन मित्र- मैत्रिणी, नवे शिक्षक याविषयी विद्यार्थ्यांमध्ये असलेली उत्सुकता स्पष्टपणे जाणवत होती व सुंदर रांगोळी, फुलांचे तोरण, फुग्यांच्या व वेगवेगळ्या आकर्षक सजावटीमुळे वातावरण प्रसन्न व आनंदमय बनले होते. सर्वप्रथम हन्नूर गावचे उपसरपंच व युवा नेते मा. सागरदादा कल्याणशेट्टी यांच्या शुभहस्ते विद्या देवी सरस्वती व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. आदरणीय पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यानंतर प्रशालेत दीर्घकाळ सेवा करून शासकीय नियत वयोमानानुसार मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाल्याने श्री. विलास बिराजदार सर व विज्ञान विषय शिक्षक श्री.विश्वनाथ चव्हाण सर यांचा सेवापुर्ती निमित्त हन्नूर गावचे उपसरपंच व युवा नेते मा.श्री. सागरदादा कल्याणशेट्टी यांच्या हस्ते फेटा शाल, हार, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले व सेवापुर्ती नंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते नवोगत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन, औक्षण करून, मिठाई भरवून स्वागत करण्यात आले व मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्री. अशोक साखरे यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. पंचप्पा कल्याणशेट्टी सरांच्या स्मृतिना वंदन करून संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार मा. श्री.सचिनदादा कल्याणशेट्टी, गुरुवर्य व जेष्ठ संचालक मा. श्री.मल्लिनाथ कल्याणशेट्टी, प्रशालेचे माजी प्राचार्य व आधारस्तंभ सन्माननिय श्री.सिध्देश्वर कल्याणशेट्टी, संचालिका सौ. शांभवीताई कल्याणशेट्टी यांचे मुख्याध्यापक पदी नियुक्त करून सेवेची संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल संस्थेचे आभार मानले व शालेय शिस्तीसह गुणवत्ता वाढीसाठी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

तसेच विद्यार्थ्यांनी नियमित शाळेला उपस्थित राहून शाळेतील सर्व उपक्रमात सहभागी होऊन शालेय नियमांचे पालन करून प्रगती साधावी असे आवाहन केले. व संचालक श्री.मल्लिकार्जून मसुती, सीईओ सौ. रूपाली शहा, विज्ञान विभाग प्रमुख सौ.पुनम कोकळगी यांनी कार्यक्रमाच्या उत्तम नियोजनाबद्दल संयोजकांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन सौ.मल्लम्मा चप्पळगाव यांनी तर आभार सौ.स्वप्नाली जमदाडे यांनी मानले. यावेळी प्रा.रविंद्र कालीबत्ते, प्रा.रमेश शिंदे, हन्नूर प्राथमिक सेमी विभाग प्रमुख शशीकांत अंकलगे, ज्ञानदेव शिंदे, धनंजय जोजन आदी शिक्षक वृंद , शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
