गावगाथा

सोनार हक्क परिषद सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी अक्कलकोटचे चंद्रकांत वेदपाठक यांची निवड

निवड नियुक्ती

सोनार हक्क परिषद सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी अक्कलकोटचे चंद्रकांत वेदपाठक यांची निवड

अक्कलकोट दि. 17 महाराष्ट्र राज्य “सोनार हक्क परिषद ” सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी अक्कलकोटचे चंद्रकांत रामचंद्र वेदपाठक यांची निवड राज्याचे अध्यक्ष राजेश पंडित रेनापुरकर यांनी केली आहे या निवडीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.
विविध गोत्रात व विविध पंथात अडकलेल्या सोनार समाजाला एकत्र आणून त्यांचा सामाजिक विकास घडऊन समाज बळकट करण्याचे उद्दिष्ट ठेवलेल्या सर्व शाखीय ” सोनार हक्क परिषदेने सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी चंद्रकांत वेदपाठक यांची निवड केल्याने परिषदेचे सल्लागार दिवाकर पात्रेकर , समन्वयक राजेंद्र पारखे, मुख्य निमंत्रक काशिनाथ पोतदार, राज्य संपर्क प्रमुख प्रकाश वेदपाठक, मार्गदर्शक निलेश धराशिवकर, राज्य कार्याध्यक्ष विजयकुमार टाक चाटोरिकर, राज्य प्रवक्ता शिवश्री सुवर्णकार, प्रसिध्दी प्रमुख शरदकुमार कुल्थे, युवा राज्य संघटक संतोष सोनार, राज्य कार्यकारिणी सदस्य सुनील पंडित, सुभाष पोतदार, रमेश शहाणे, अमोल हीलाले आदी मान्यवरांनी या निवडीचे स्वागत करून चंद्रकांत वेदपाठक यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button