भुरिकवठे ग्रामपंचायतीची अजब कहानी नळाला येतोय गढूळ पाणी : नागरिकांच्या आरोग्य धोक्यात
नागरिक समस्या
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/06/IMG-20240618-WA0076-506x470.jpg)
भुरिकवठे ग्रामपंचायतीची अजब कहानी नळाला येतोय गढूळ पाणी : नागरिकांच्या आरोग्य धोक्यात
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
भुरिकवठे गावात गेल्या महिन्याभरापासून नळाला गढूळ पाणी येत आहे याकडे ग्रामपंचायतीचे पूर्णपणे दुर्लक्ष्य होत आहे.गावातील बस स्टॉप वर ग्रामपंचायतीच्या शेजारी पाण्याच्या टाकीखाली पाणी सोडण्याचे वाल असून ते पूर्णपणे लिकेज असून त्यातून टाकीला जाणाऱ्या पाण्यामधे पावसाचे साचलेले गढूळ पाणी टाकीत जात असून तेच पाणी गावातील लोक पिण्यासाठी वापरत आहेत.अश्या नळाला येणाऱ्या गढूळ पाण्यामुळे लहान मुल वयस्कर व्यक्तीमध्ये उलटी जुलाबाचे प्रमाण वाढलेले आहे लोक आजारी पडत आहेत. गावातील लोकांच्या जीवाशी ग्रामपंचायत खेळ खेळत आहे. याकडे जाणूनबुजून ग्रामपंचायत दुर्लक्ष्य करत आहे ग्रामपंचायतीने याकडे जातीने लक्ष घालून 2 दिवसात दुरूस्थी करून घ्यावी अन्यथा ग्रामपंचायतीला कुलूप ठोकण्यााचा ईशारा ग्रामस्थांकडून देण्यात येत आहे..
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)