अनंत चैतन्य प्रशालेत किशोरवयीन मुलींसाठी आरोग्यविषयक कार्यशाळा संपन्न—–
————————————— मुलींचे बालपण संपून तारुण्य सुरू होईपर्यंतच्या संक्रमण कालावधीला सामान्यपणे पौगंडावस्था म्हणतात. किशोरावस्था किंवा कुमारावस्था म्हणून ओळखला जाणारा हा काळ वयाच्या १० ते १८ वर्षादरम्यानचा असतो.वयात येत असताना मुलींच्या जीवनातील हा काळ त्यांच्या भावी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. असे प्रतिपादन आज महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, हन्नूर येथे आयोजित “एकदिवसीय आरोग्यविषयक कार्यशाळेत” प्राथमिक आरोग्य केंद्र, चप्पळगावच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवलिला माळी यांनी केले. “किशोरवयीन मुलींच्या समस्या व उपाय” या विषयावर त्या बोलत होत्या. तर ” निरोगी व निकोप वाढीसाठी किशोरवयीन मुलींनी ” आरोग्य, आहार व स्वच्छतेबाबत विशेष दक्षता घ्यावी असे मत ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट च्या वैद्यकीय अधिकारी डॉ.शिफा बागवान यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना या कार्यशाळेतून व्यक्त केल्या. किशोरवयात शारीरिक व बौद्धिक वाढ होऊन सामाजिक जाणिवा दृढ होत असतात. मुलींना सकारात्मक आधार देऊन याबाबतचे शिक्षण देण्यासंबंधी व त्यांच्या विविध समस्यांवर समुपदेशन करणे अत्यंत गरजेचे असते हे लक्षात घेऊन संस्थेच्या संचालिका सौ. शांभवीताई कल्याणशेट्टी यांच्या निर्देशानुसार सदर कार्यशाळेचे प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक साखरे यांनी आयोजन केले होते. या कार्यशाळेत सातवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या जेष्ठ शिक्षिका सौ. मृदुलादेवी स्वामी होत्या.यावेळी ग्रामीण रुग्णालय च्या आरोग्यसेविका सौ. विजयालक्ष्मी कोरे , हन्नूर प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्यसेविका सौ. मंजुळा जाधव, आशावर्कर्स सौ. मायव्वा घोडके,मनिषा बाळशंकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन सौ. मल्लम्मा चप्पळगाव यांनी केले तर आभार सौ. स्वप्नाली जमदाडे यांनी मानले. आजच्या या प्रशालेच्यावतीने आयोजित महत्वपूर्ण उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व आमदार मा. सचिनदादा कल्याणशेट्टी,संस्थेचे जेष्ठ संचालक व मार्गदर्शक आदरणीय मल्लिनाथ कल्याणशेट्टी, प्रशालेचे माजी प्राचार्य व आधारवड सन्माननीय श्री. सिद्धेश्वर कल्याणशेट्टी, हन्नूर चे उपसरपंच व युवा नेते मा. सागर कल्याणशेट्टी, संचालक श्री. मल्लिकार्जुन मसुती, सी. ई. ओ. सौ. रुपाली शहा, ज्युनियर विभाग प्रमुख सौ. पुनम कोकळगी यांनी समाधान व्यक्त केले.