लोकशाही दिन तहसील कचेरीतच घेण्यात यावा – ग्राहक कल्याण फाउंडेशन दौंडची तहसीलदारांकडे मागणी
दौंड (प्रतिनिधी) –
लोकशाही दिन हा दर महिन्याला तालुक्यातील विविध गावांमध्ये घेण्यात येतो. मात्र अनेकदा अधिकारी वर्ग गैरहजर राहत असल्यामुळे नागरिकांची कामे प्रलंबित राहतात. त्यामुळे लोकशाही दिन तहसील कचेरीतच घेण्यात यावा, अशी मागणी ग्राहक कल्याण फाउंडेशन दौंड तालुक्याच्यावतीने तहसीलदार श्री. अरुण शेलार यांच्याकडे करण्यात आली.
या निवेदनाच्या वेळी श्री. मारुती पठारे, श्री. संदीप चव्हाण, श्री. अनिल नेवसे, सौ. सविताताई सोनवणे, श्री. शेलार साहेब व श्री. सुरेश पवार उपस्थित होते.
सद्यस्थितीत लोकशाही दिन विविध गावांमध्ये साजरा केला जातो. यामुळे नागरिकांचा प्रवासखर्च वाढतो, तसेच अधिकारी उपस्थित नसल्यास त्यांची कामे मार्गी लागत नाहीत. त्यामुळे तहसील कार्यालयातच लोकशाही दिन आयोजित करावा, जेणेकरून सर्व अधिकारी एकत्र उपस्थित राहतील व नागरिकांची कामे तातडीने मार्गी लागतील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महिन्याच्या पहिल्या किंवा तिसऱ्या मंगळवारी तहसील कार्यालयातच लोकशाही दिन नियमित घेण्यात यावा, अशीही सूचना देण्यात आली. यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळेल, हेलपाट्यांची गरज भासणार नाही आणि शासकीय कामकाजात गतिमानता येईल, असे ग्राहक कल्याण फाउंडेशन दौंड तालुक्याच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन लेखी स्वरूपात कळवावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!