जिल्हा घडामोडीगावगाथाठळक बातम्या

Solapur : ग्रामीण भागातील नागरिकांची , शेतकऱ्यांची अडवणूक करू नका, त्यांच्या अडचणी सुटण्यासाठी, त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी सहकार्य करा – खासदार प्रणिती शिंदे

सोलापूर (प्रतिनिधी): खासदार प्रणिती शिंदे यांनी आज रोजी सोलापूर जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या कामकाजासंबंधीत आढावा बैठक घेतली. या बैठकीत सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत, कृषी विभाग, बांधकाम विभाग, लघु पाटबंधारे, समाज कल्याण, ग्रामीण पाणीपुरवठा, महिला बालकल्याण, पशुसंवर्धन, शिक्षण, आरोग्य, उमेद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ग्रामीण स्वच्छता अभियान आदी विभागाची विविध कामे इत्यादी बाबत चर्चा झाली. यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी ग्रामीण भागातील नागरिकांची, शेतकऱ्यांची अडवणूक न करता त्यांच्या अडचणी सुटण्यासाठी व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे असे अधिकारी वर्गाला उद्देशून म्हणाल्या.

तसेच यावेळी आगामी काही महिन्यात विधानसभा निवडणूक लागणार असून आचारसंहितेच्या अगोदर सोलापूर जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे व नवीन विकासकामे मंजूर करून मार्गी लावण्याच्या सूचना केल्या.

 

यावेळी जिल्हा परिषदेचे सीईओ मनीषा आव्हाळे, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, अँड नंदकुमार पवार, सुरेश हसापुरे, सुलेमान तांबोळी, राजेश पवार, प्रशांत साळे, शालिवाहन माने, मनोज यलगुलवार, मल्लिकार्जुन पाटील, पांडुरंग जावळे, संदीप पाटील, भारत जाधव, तिरुपती परकीपंडला, निलेश जरग , सचिन गुंड अँडीशनल सीईओ संदीप कोहिनकर यांच्यासह ग्रामीण भागातील नागरिक, जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button