गावगाथा

अन्नक्षेत्र मंडळाचे नूतन अत्याधुनिक भव्य ५ मजली महाप्रसादगृह इमारतीच्या बांधकामास प्रत्यक्ष प्रारंभ करण्यात आले.. भूमी पूजन सोहळा संपन्न 

भूमी पूजन सोहळा

अन्नक्षेत्र मंडळाचे नूतन अत्याधुनिक भव्य ५ मजली महाप्रसादगृह इमारतीच्या बांधकामास प्रत्यक्ष प्रारंभ करण्यात आले.. भूमी पूजन सोहळा संपन्न 

 

(प्रतिनिधी)

*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली रु. ६० कोटीच्या ५ मजली भव्य महाप्रसादगृह इमारतीच्या बांधकामास रविवारी प्रत्यक्ष प्रारंभ करण्यात आला.*

दरम्यान न्यासाच्या ३७ वा. वर्धापन दिन व श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या वेळी रविवार दि.२१ जुलै २०२४ रोजी मोठ्या थाटात व उत्साहात भव्य महाप्रसादगृह इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला होता. रविवार दि.१० नोव्हेंबर २०२४ रोजी महाप्रसादगृह इमारतीच्या बांधकामास प्रारंभ विधिवत पूजन स्वामी भक्त व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. न्यासाचे पुरोहित सोमकांत कुलकर्णी यांच्या मंत्र पठणाने विधिवत पूजा संपन्न झाले.

याप्रसंगी स्वामी भक्त श्री व सौ. राहुल पवार व प्रकाश पवार बारामती, प्रशांत दिवार, रविकांत गायकवाड, स्वरूप दिवार, श्रीकांत खुर्द पुणे, केशव शेंडगे सोलापूर व न्यासाचे सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, साईसुश्रुत डेव्हलपर्स पुणे, कन्स्ट्रक्शन्सचे प्रो. निहार आडकर, प्रकल्प व्यवस्थापक रामदास तांबे, अभियंता स्वप्नील खवळे, बाबू चौगुले, अमर बोंद्रे, यादव, न्यासाचे अभियंता अमित थोरात, किरण पाटील, आर्किटेक योगेश अहंकारी, डॉ. विनायक बुधले, मनोज निकम, रोहित खोबरे, सौरभ मोरे, रोहन शिर्के, निखील पाटील, प्रविण घाडगे, दत्ता माने, मनोज जगताप, अतिश पवार, मुन्ना कोल्हे, बसवराज क्यार, गोटू माने, प्रविण घाडगे, सुमित कल्याणी, राहुल इंडे, भरत पाटील, प्रतिक पोळ, प्रकाश लोंढे, श्रीशैल माळी, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी, राजू पवार, प्रसाद हुल्ले यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

*⭕चौकट :*
*• नेत्रदीपक वाटचाल :* श्री स्वामी समर्थ महाराजांच्या असीमकृपेने, न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळ हे नेत्रदीपक वाटचाल करीत आहे.

⭕*एक दृष्टिक्षेप :*
होणाऱ्या महाप्रसाद गृहाची इमारत ही भव्य आणि मंदिर सदृश्य असणार आहे. ही इमारत पूर्णपणे वातानुकुलित असून, या इमारतीचे बांधकाम क्षेत्र १ लाख १९,३९८ चौरस फुट असणार आहे. इमारतीच्या टेरेसवर श्री स्वामी समर्थांची ५१ फुटांची सुंदर, रेखीव आणि भव्य मुर्ती, सर्वांचे लक्ष वेधून घेईल. या नवीन नियोजित महप्रसादगृहात २५०० भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था असून, या आराखड्याच्या माध्यमातून हे पाहू शकता की, एकूण ५ हजार भाविकांसाठी बसून सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा प्रतिक्षा कक्षाचे नियोजन करण्यात आले आहे. शिवाय या इमारतीच्या तळघरामधे धान्य- भाजीपाला कोठार, चटणी व पिठाची गिरणी तसेच १ तासामध्ये ८०० चपाती तयार करता येणाऱ्या ७ मशिन्स, आणि भांडे धुण्यासाठी डिश वॉशर यांची देखील सोय आहे. संपूर्ण इमारतीमध्ये अग्निशामन यंत्रणा बसविण्यात येणार आहे. सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज व प्रशस्त इमारत, स्वामी भक्तांच्या देणगीतून साकार होणार आहे. या बांधकामाचा सर्वसाधारण अंदाजे खर्च रुपये ६० कोटी, इतका आहे.

-शामराव मोरे सचिव, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button