
*चपळगाव प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न!*


चपळगाव दि.
21 जून पूर्ण विश्वात योग दिन म्हणून साजरी केली जाते.
या दिनाचे औचित्य साधून
ग्रामीण विद्या विकास विद्यालय, चपळगाव येथे विविध आसन व प्राणायाम सह योग दिन साजरी करण्यात आली.
सर्व प्रथम प्राचार्य श्री.माने सरांनी सर्वाना योग दिनाच्या शुभेच्छा दिले.
त्यानंतर महाराष्ट्र वन विभागाचे श्री. आहेर साहेब यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व सांगितले. “एक पेड, माँ के नाम” या उपक्रमांतर्गत
प्रशालेस वन विभागाकडून रोपांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी पर्यवेक्षक श्री. बानेगाव सर, CEO नीलकंठ पाटील सर व सर्व विभागाचे गुरुजन वर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

प्रशालेतील योग शिक्षक श्री. माणकोजी सरांनी आपल्या सुमधुर वाणीसह योगाचे मानवी आरोग्यासाठी फायदे सांगितले आणि योगासनातील विविध आसनांचे मार्गदर्शन केले.
प्रशालेतील गुरुजन वर्ग आणि विध्यार्थी यांनी विविध योग आसन स्वतः करून योग दिन साजरी केले.
यावेळी विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
