
सोलापुरातील हॅशटॅग सँडविच कॅफेला महेश इंगळेंची सदिच्छा भेट.

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१३/१/२४) – सोलापूरच्या वालचंद कॉलेज परिसरातील नव्याने शुभारंभ झालेल्या विक्रांत तुळजापूरकर यांच्या हॅशटॅग सँडविच कॅफेला श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळेंनी मित्रपरिवार समवेत नुकतच सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी विक्रांत तुळजापूरकर परिवारच्या वतीने महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. हॅशटॅग सँडविच कॅफे व विक्रांत तुळजापूरकर परिवारास स्वामी समर्थांचे कृपाशीर्वाद लाभावे यासाठी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन विक्रांत तुळजापूरकर व कुटूंबीयांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सन्मान करुन सँडविच कॅफे व्यवसाय भरभराटी करीता शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे, सेवा सदन प्रशालेचे माजी मुख्याध्यापिका मानसी दामले, विक्रांत तुळजापूरकर, शशिकांत तुळजापूरकर, भाग्यश्री तुळजापूरकर, महेश गोफणे,
शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, सागर गोंडाळ, स्विमिंग ग्रुपचे संतोष पराणे, श्रीकांत झिपरे, अरविंद पाटील, सचिन किरनळी, शैलेश राठौर, खाजाप्पा झंपले, काका सुतार, ओंकार उटगे, मनोज इंगुले, सुनील पवार, अशोक कलशेट्टी, शेखर आडवीतोटे, संतोष जमगे, प्रसन्न हत्ते, अमर पाटील, काशिनाथ सोलनकर इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – तुळजापूरकर व कुटूंबीयांचा सत्कार करताना महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, मानसी दामले व अन्य दिसत आहेत.
