न्यासाकडून श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिराचे पुरोहित मंदार मोहनराव पुजारी यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार
वाढदिवस विशेष
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/06/IMG-20240623-WA0058-780x470.jpg)
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिराचे पुरोहित मंदार मोहनराव पुजारी यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळा रविवारी संपन्न झाला.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
दरम्यान श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, विश्वस्त संतोष भोसले हे उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
यावेळी न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, शहाजीबापू यादव, निखील पाटील, संतोष जाधव, प्रवीण घाडगे, गोटू माने, योगेश कटारे, संकेतराव शिंदे, पिट्टू साठे, बलभीम पवार, बाळासाहेब पोळ, बाळासाहेब घाटगे, सतीश महिंद्रकर, शरद भोसले, प्रसाद हुल्ले, रमेश हेगडे, महांतेश स्वामी, शिव स्वामी, एस.के. स्वामी, धनंजय निंबाळकर, विशाल घाटगे, तानाजी पाटील, अनिल बिराजदार, शावरेप्पा माणकोजी, मल्लिनाथ कोगनुरे, विठ्ठल रेड्डी, विश्वनाथ कलशेट्टी, खंडेराय होटकर, देवराज हंजगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)