गावगाथाठळक बातम्या
PCMC Rain: आठवड्याभराच्या हुलकावणीनंतर पिंपरी चिंचवडमध्ये तासाभरात ११४ मिलीमीटर पाऊस

निगडी (प्रतिनिधी) : पिंपरी चिंचवड शहराला आज (दि.२३) सायंकाळी पावसाने चांगलाच झोडपून काढले आहे. गेल्या आठवड्याभरात दररोज ढगाळ वातावरण राहायचा मात्र वारंवार पावसाने हुलकावणी देत राहिला .

मात्र आज दुपारपासून ढगाळ वातावरण निर्माण झाला आणि सायंकाळी ४:३० च्या सुमारास वारा आणि ढगांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. बघता बघता तासाभरात शहरात तब्बल ११४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

दरम्यान, या पावसामुळे काही काळ अनेक ठिकाणी रस्ते तुंबलेले चित्र पाहायला मिळाले तर काही ठिकाणी भिंत आणि झाडे पडल्याचे वृत्त आहे.
