गावगाथाग्रामीण घडामोडीठळक बातम्या
MSRTC accident : पंढरपूर – मुंबई एसटी बसचा यवत परिसरात अपघात ; चालकासह २५ ते ३० प्रवासी जखमी असल्याची माहिती

यवत (प्रतिनिधी): पंढरपूर पासून मुंबईकडे निघालेल्या एसटी बसचा यवत परिसरात भीषण अपघात झाला आहे. यामध्ये बस चालकासह २५-३० प्रवासी जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर आगाराहून बस क्रमांक एम एच 40 एन 9519 ही बस सकाळी सुटली. भिगवणच्या पुढे यवतच्या हद्दीत आल्यानंतर सदर बसला पाठीमागून दुसऱ्या (अज्ञात) वाहनांनी धडक दिली , यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने बस झाडावर जाऊन आदळली. यामध्ये बस चालकासह २५-३० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उरूळी कांचन येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. याबाबत अधिक तपास यवत पोलिस करीत आहेत.
