अक्कलकोट विक्रमवीर आणखी एक शिखर पादाक्रांत करत धानय्या जी कौटगीमठ ७५ वी परीक्षा उत्तीर्ण होत अमृत महोत्सव गाठले !
शैक्षणिक बातमी

अक्कलकोट विक्रमवीर आणखी एक शिखर पादाक्रांत करत धानय्या जी कौटगीमठ ७५ वी परीक्षा उत्तीर्ण होत अमृत महोत्सव गाठले !


अक्कलकोट: येथील के एल ई मंगरुळे प्रशाळेतील शिक्षक धानय्या जी कौटगीमठ सर यांनी आंध्र प्रदेश शिक्षक पात्रता एपी टी ई टी२०२४ प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक असे तीन टीईटी उत्तीर्ण झाले.


आज दिनांक २५ जून२०२४ रोजी आंध्र प्रदेश टी ई टी परीक्षा निकाल जाहीर करण्यात आला. एकूण २ ,६७ ,७८९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ही परीक्षा आंध्र प्रदेश शासनाच्या शिक्षण विभागाने दिनांक १ आणि २ मार्च २०२४ रोजी एपी टी ई टी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला होता.

धानय्या कौटगी मठ सरांना पेपर २ इंग्रजी १५० पैकी ११२ गुण , पेपर २ समाजशास्त्र १५० पैकी १०५ गुण ,पेपर २ विशेष शिक्षण १५० पैकी १०२ गुण मिळाले.
देशातील वेगवेगळ्या राज्यातील सेट ,नेट ,पेट आणि टी ई टी परीक्षा सलगपणे ७५ वेळा उत्तीर्ण होत विश्व विक्रम करून ,त्या परीक्षेतील मिळालेल्या अनुभव घेऊन इतर विद्यार्थ्यांना यु ट्यूब मार्फत मोफत मार्गदर्शन करीत आहेत. आता पर्यंत धानय्या सरांच्या मार्गदर्शन खाली ६५६ विद्यार्थी सेट नेट टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाले आहे