प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश प्राप्तीकडे वाटचाल करावे. श्री मल्लिनाथ कल्याणशेट्टी (सर)
सन 2022-23 इयत्ता १२वी विद्यार्थी निरोप समारंभ कार्यक्रम

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश प्राप्तीकडे वाटचाल करावे. श्री मल्लिनाथ कल्याणशेट्टी (सर)

श्रीक्षेत्र तीर्थ* श्री रामलिंगेश्वर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय श्रीक्षेत्र तीर्थ. येथे सन 2022-23 इयत्ता १२वी विद्यार्थी निरोप समारंभ कार्यक्रम पार पाडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.भीमाशंकर बिराजदार तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महर्षी विवेकानंद समाज कल्याण संस्था अक्कलकोटचे जेष्ठ संचालक तथा माजी मुख्याध्यापक श्री मल्लिनाथ कल्याणशेट्टी सर उपस्थित होते. प्रारंभी ग्रामदैवत श्री रामलिंगेश्वर प्रतिमेच पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न होऊन कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त केले.मनोगतात इयत्ता अकरावी व बारावी दोन वर्षांमध्ये गुरु शिष्य नात्यातील ऋणानुबंध , संस्था व शाळा याविषयी आपले भावना व्यक्त करून कृतज्ञता व्यक्त केले. कल्याणशेट्टी सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थी जीवनात विद्यार्थी भविष्यातील ध्येय धोरण आखून त्यास अनुसरून प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची जिद्द आपल्यामध्ये असले पाहिजे असे प्रतिपादन केले. शालेय जीवनातील अनेक उदाहरणासह विद्यार्थी भारतीय संस्कृतीचा जतन,सामाजिक कार्य, शिक्षण घेऊन मोठ्या हुद्द्यावर गेल्यानंतर आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो याचा जाणीवेतून जगलं पाहिजे असे मार्गदर्शन केले. प्रा.डॉ. भीमाशंकर बिराजदार सर अध्यक्षीय समारोपात स्वयंस्फूर्तीने केलेले विद्यार्थी मनोगताचे कौतुक करून ग्रामीण भागातील गरिब व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता संस्था आपल्या पाठीशी आहे असे प्रतिपादन केले. यावेळी श्री नागराज पाटील, अमर पाटील,सिद्धाराम पाटील, शांतप्पा बगले , प्राचार्य श्री सुधीर सोनकवडे, रेवणय्या मठपती, आदी शिक्षक वृंदांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. ऐश्वर्या वळसंगे व कु. आम्रपाली गायकवाड यांनी केले तर आभार महेश पट्टणशेट्टी यांनी मानले. यावेळी बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
