Dehu : संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज संभाजी महाराज देहूकर यांचे निधन

निगडी (प्रतिनिधी): महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार, संत साहित्याचे अभ्यासक, तुकाराम महाराज संस्थानचे माजी विश्वस्त, तुकोबारायांचे दहावे वंशज ह.भ.प. संभाजी महाराज मोरे देहूकर यांचे आज देहावसान झाले.

हभप संभाजी महाराज हे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील देहूगाव येथील रहिवासी होते. संभाजी महाराज यांनी संत तुकाराम महाराजांच्या जीवन चरित्राचा सांगोपांग अभ्यास करून कीर्तन, प्रवचन आणि चरित्र कथन या माध्यमांतून तुकोबारायांच्या आध्यात्मिक जीवनकार्याचा प्रचार-प्रसार केला आहे. त्यांनी अनेक वर्ष वीना पादत्राणे वारी केली आहे. आषाढी कार्तिकीच्या निमित्ताने त्यांनी महाराष्ट्रभर कीर्तन प्रवचने केली आहेत. संभाजी महाराज यांच्या कीर्तनाची परंपरा त्यांचे चिरंजीव प्रशांत महाराज देहूकर ही पुढे नेत आहेत.

देहुकर महाराज यांच्याबद्दल..


१) जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे १० वे वंशज.
२) जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांवरील जीवनचरित्रात्मक कादंबरी लिहिली आहे.
३) ‘संत तुकाराम महाराज देवस्थान संस्थान’चे माजी विश्वस्त आणि आषाढी वारी पालखी सोहळा प्रमुख.
४) ‘अखिल भारतीय वारकरी मंडळा’चे माजी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष.