*चपळगाव प्रशालेत राजर्षी छ.शाहू महाराज जयंती आणि प्राचार्य स्व. पी. वाय. पाटील सर पुण्यस्मरण दिन संपन्न!*
जयंती व पुण्यतिथी निमित्त

*चपळगाव प्रशालेत राजर्षी छ.शाहू महाराज जयंती आणि प्राचार्य स्व. पी. वाय. पाटील सर पुण्यस्मरण दिन संपन्न!*

चपळगाव दि.26/06/2024

आज ग्रामीण विद्या विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, चपळगाव येथे राजर्षी छ. शाहू महाराज यांची 150वी जयंती व प्राचार्य स्व. पी. वाय. पाटील सर यांचा 16 वा पुण्यस्मरण दिन साजरा करण्यात आला.

यानिमित्त आयोजित मोफत नेत्र चिकित्सा शिबीराचे उदघाटन श्री. सिद्धेश्वर कल्याणशेट्टी सर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या शिबिरामध्ये 127 जणांची तपासणी करून 40 रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी सांगली येथे पाठविण्यात आले.


सर्वप्रथम उपस्थित अभ्यागतांचे स्वागत, परिचय व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.रविकांत पाटील साहेब यांनी केले.1963 मध्ये या शाळेची स्थापना झाली. अनेक माजी विध्यार्थी विविध क्षेत्रात नामवंत बनले आहेत. संस्थेने आता प्राथमिक सेमी इंग्लिश स्कूल चालू केले आहे व या विभागाला चपळगाव व पंचक्रोशीतील पालकांकडून खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे.
प्रमुख अतिथी श्री.शरद धावड सर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रसिद्ध साहित्यकार, व्याख्याते श्री. संजय कळमकर सर यांच्या हस्ते राजर्षी छ. शाहू महाराज,स्व. पी. वाय. पाटील सर आणि माजी आमदार मरहुम इनायतअली (काका) पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय कळमकर सरांचा सत्कार श्री. रविकांत पाटील साहेब यांच्या हस्ते तर प्रमुख अतिथी शरद धावड साहेबांचा सत्कार श्री.प्रभाकर हंजगे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. चपळगाव प्रशालेवर विशेष प्रेम असलेले,जेष्ठ नेते, श्री. सिद्धेश्वर कल्याणशेट्टी यांचा सत्कार श्री. पंडित पाटील व श्री. काशिनाथ उटगे सरांनी केले.
प्रशालेत दीर्घकाळ नोकरी करून सेवानिवृत्त झालेले प्राचार्य श्री.शिवबाळ मुली सर, श्री. रमेश कत्ते सर व श्री. शिवानंद श्रीगिरी सर आणि वैद्यकीय क्षेत्रात रुग्ण सेवेतून समाज कार्य करत असलेले सेवानिवृत्त डॉ. मल्लिनाथ मलंग यांचा संस्था व प्रशाला परिवाराकडून विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी 10 वी व 12 वीतील गुणवंत विध्यार्थांचा पी. वाय. पाटील फाउंडेशनच्या वतीने गौरव करण्यात आला.
सत्कारास उत्तर देताना श्री.मुली सर म्हणाले की, स्व. पी. वाय पाटील सर,माजी आमदार मरहुम इनायतअली (काका) पटेल आणि स्व. शंकरराव हंजगे साहेब यांच्या शिकवणीत मी घडलो.
श्री. रविकांत पाटील साहेब, श्री. प्रभाकर हंजगे साहेब व सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदशानातून सेवाकाळ पूर्ण करू शकलो.माझी जन्मभूमी मंगरूळ तर कर्मभूमी चपळगाव आहे!
यानंतर अतिथी धावड सरांनी आजच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्याबद्दल संस्थेचे व प्रशालेचे आभार व्यक्त केले.
अध्यक्षीय उद्बोधन करताना श्री. संजय कळमकर म्हणाले ,या माळरानावर स्व. पी. वाय. पाटील सर व त्यांच्या इतर सहकार्यांनी 60 वर्षांपूर्वी शिक्षणाचे रोप लावले आणि आज ते वटवृक्ष बनले आहे.
विध्यार्थ्यांनी TV व मोबाईलपासून दूर राहून पुस्तकांची मैत्री करावी. जीवनातील कोणत्याही क्षेत्राला कमी लेखू नये.
सरांनी आपल्या मधुर वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी संस्था सर्व पदाधिकारी, सेवानिवृत्त शिक्षक के. बी. पाटील सर,नंदकुमार पाटील,संजय बानेगाव, महादेव वाले,दयानंद फताटे,गौरीशंकर म्हमाणे सर,विजयकुमार नन्ना सर,दिपक पाटील,पंचक्रोशीतील मान्यवर,पालक वर्ग,
प्राचार्य माने सर,पर्यवेक्षक बानेगाव सर,CEO नीलकंठ पाटील सर,सर्व विभागाचे गुरुजन वर्ग आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग,सेमी इंग्लिश विभागाचे प्रमुख श्रीमती शेख मॅडम व सर्व स्टाफ आणि विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजापुरे सरांनी केले तर आभार प्राचार्य माने सरांनी मानले.