गावगाथा

लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनेलचा द्वितीय वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न

श्री बनशंकर चाबुकस्वार - पोलीस (SRP) सेवेसाठी पुरस्कार

लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनेलचा द्वितीय वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न

सोलापूर प्रतिनिधी
दिनांक २६ जून रोजी फडकुले सभागृह सोलापूर येथे लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनेलच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त तसेच छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमास माजी सहाय्यक पोलीस आयुक्त दिपक आर्वे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र संकुलाचे माजी विभागप्रमुख डॉ रविंद्र चिंचोळकर,एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे, अजित पाटील, कवयित्री प्रांजली मोहीकर,सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सोलापूर महानगरपालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे,Ask इंग्लिश स्पीकिंग कोर्सचे राजकुमार बाके, पत्रकार संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, सारा न्यूज नेटवर्कचे राम हुंडारे, दैनिक लोकशाही मतदारचे अक्षय बबलाद, उपेंद्र गायकवाड, महानगरपालिकेचे आरोग्य निरिक्षक जयकुमार कांबळे, युवा चित्रकार सिद्धार्थ शिरसठ, बोधिवृक्ष फाउंडेशनचे उमाकांत राजगुरू, सोल्जर केदार उंबरजे, युवासेना तालुका उपाध्यक्ष अनिकेत लोंढे, ज्येष्ठ पत्रकार अनिल वाले, गायिका वानीश्री सज्जन, योगीराज अरळीमार, पत्रकार रोहीत मस्के, वैभव इंगळे , रजनीकांत इंगळे यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी भेटी देऊन चॅनेलला शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तद्नंतर उपस्थित प्रमुख मान्यवरांचा सत्कार हार तुरे आदींनी न करता पर्यावरण पूरक संदेश देण्यासाठी प्रत्येकी एक रोप देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाप्रसंगी सोलापुरातील युवा चित्रकार सिद्धार्थ शिरसठ यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे रेखाटलेले चित्र कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले.उपस्थित मान्यवरांनी लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनेलच्या वतीने सुचवलेल्या या संकल्पनेला चित्रकार सिध्दार्थ शिरसठ यांनी रेखाटलेल्या शाहू महाराजांच्या चित्राचे तोंडभरून कौतुक केले, दरम्यान विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गुणगौरव करुन सन्मानचिन्ह,सन्मानपत्र व पर्यावरण पूरक संदेश म्हणून प्रत्येकी एक रोप देऊन यथोचित सत्कार करण्यात आला
सन्मानित केलेले गुणिजन पुढीलप्रमाणे –

🔹 सोल्जर अरुणकुमार उडाणशिव – देशसेवा . 

🔹बबलु गायकवाड – समाजसेवा

🔹ॲड. रविंद्र दुलंगे – विधी सेवा

🔹 सविता गायकवाड – मुख्याध्यापिका

🔹 डॉ. औदुंबर मस्के – आरोग्य सेवा

🔹 श्री. यशपाल श्रीकांत वाडकर – सरपंच

🔹 श्रीमती मिरा देसाई – उद्योजिका

🔹 श्री विशाल सुर्वे – उद्योजकता विकास ट्रेनिंग

🔹 श्री.श्रीकांत बुर्जे – पोलीस सेवा

🔹 अ.हमीद अ. रशीद हीरोली – सफाई निरीक्षक

🔹 प्रा. डॉ. अंजना गायकवाड – निवेदिका

🔹 श्रीमती देवगणा इंगळे – सफाई कामगार

🔹 श्री.महेंद्र जाधव – कनिष्ठ अभियंता

🔹संभव फाऊंडेशन – मनोरुग्ण सेवा

🔹 डॉ.लक्ष्मण राऊतराव – पशू सेवा

🔹 श्री बनशंकर चाबुकस्वार – पोलीस (SRP) सेवा.

आदी सत्कारमूर्तीचा सत्कार करून गौरविण्यात आले

‘झाडांसाठी खड्डे तुम्ही मारा, रोपटे आम्ही देऊ त्याचबरोबर झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी दोघांची राहिल’, असे

आवाहन या कार्यक्रमाप्रसंगी बोधिवृक्ष फाउंडेशन सोलापूर यांच्यावतीने करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहूल उडाणशिव, सिद्धार्थ भडकुंबे, अमोल वाघमारे, रमेश जाधव, डॉ.सिद्धार्थ तळभंडारे, किरण कांबळे,हरिष फडतरे,विनोद फडतरे,महेश गायकवाड, मंगेश दावणे, सतिश ढावरे, लकी जाधव, उमर फारूक शेख, सुरज थोरात, राजू वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमास वनविभागाचे अधिकारी दिपक खलाणे आणि अजय भालेराव यांचे विशेष सहकार्य लाभले.

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले तर आभार प्रदर्शन लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनेलचे मुख्य संपादक संगप्पा कांबळे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button