गावगाथा

सहाय्यक आगार व्यवस्थापक विजय हाटले सेवानिवृत्त…

सेवानिवृत्त निमित्त सत्कार

सहाय्यक आगार व्यवस्थापक विजय हाटले सेवानिवृत्त…

HTML img Tag Simply Easy Learning    

बेस्ट परिवहन उपक्रमातील वांद्रे आणि सांताक्रुझ आगाराची सहाय्यक आगार व्यवस्थापक या पदाची जबाबदारी सांभाळणारे अधिकारी विजय गोविंद हाटले नुकतेच साडे चौतीस वर्षांच्या सेवेनंतर दिनांक २८ जून २०२४ रोजी नियत वयोमानानुसर सेवानिवृत्त झाले.यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बेस्ट मधील अनेक आजी माजी अधिकारी, नातेवाईक, मित्र परिवार आदी मान्यवर गोरेगाव आगारात उपस्थित होते.१९९० रोजी कुलाबा बेस्ट मेन ऑफिसमध्ये ऑडिट क्लर्क या पदावर बेस्ट मध्ये हाटले यांनी नोकरीला सुरुवात केली होती.त्यानंतर डिपार्टमेंट परीक्षा उत्तीर्ण होऊन विविध आगारात त्यांनी अधिकारी म्हणून सौजण्याने काम पाहिले.एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांचेकडे पाहिले जायचे.हाटले यांचे वडील, मोठे व छोटे बंधू हे देखील बेस्ट मध्येच नोकरीला होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी डेपो मॅनेजर शिवदासन नंबियार तर प्रमुख पाहुणे म्हणून एडीएम विल्सन लुईस, तसेच बेस्ट मधील आजी माजी अधिकारी कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी हाटले यांनी आपण ज्यांच्या ज्यांच्या बरोबर काम केले असे कनिष्ठ आणि ज्येष्ठ कर्मचारी अधिकारी, बेस्ट चा स्टाफ सर्वांचेच आभार मानले.निवृत्ती नंतर परिवारातील राहिलेली अनेक पेंडींग कामे करण्यास प्राधान्य देणार असल्याचे हाटले यांनी सांगितले.कार्यक्रमाची सांगता सुग्रास भोजनाने करण्यात आली.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button