Akkalkot : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाच्या विविध विकासकामांसाठी केंद्राकडून ८१५ कोटी निधी मंजुर ; आमदार कल्याणशेट्टींच्या प्रयत्नांना यश

अक्कलकोट (प्रतिनिधी): अक्कलकोट तालुक्याचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नातून तालुक्याच्या विविध विकासकामांसाठी कोट्यावधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान आज आणखीन ८०० कोटींची भर पडली आहे.

यामध्ये राष्ट्रीय महामार्ग 548B धाराशिव जिल्हा हद्द ते- वागदरी-अक्कलकोट-अक्कलकोट स्टेशन-नागणसूर- तोळणूर आणि बोरोटी सीमे जवळच्या कर्नाटक हद्दीपर्यंत रुंदीकरण होणार असून या महामार्गासाठी 580 कोटी

राष्ट्रीय महामार्ग 465 तिलाठी गेट-आचेगाव-वळसंग-धोत्री- मुस्ती मार्गे हैदराबाद मार्गापर्यंतच्या रुंदीकरण पूर्वतयारीसाठी 200 कोटी

अक्कलकोट ते दुधनी मार्गावरील बोरी उमरगे गावाजवळील पुलाची उंची वाढवण्यासाठी 35 कोटी असा एकूण 815 कोटींचा निधी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर करून दिला आहे.

या मंजूर करण्यात आलेल्या निधीचा दोन राष्ट्रीय महामार्ग सुधारण्यासाठी व एका पुलाची उंची वाढविण्यासाठी उपयोग होणार असून यामुळे अक्कलकोट तालुक्यातील दळणवळणाच्या समस्या मिटण्यासही मदत होईल. हा निधी मंजूर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस व केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी यांचे तमाम अक्कलकोट तालुक्यातील जनतेकडून मनापासून आभार – आमदार सचिन कल्याणशेट्टी