गावगाथा

माणूसकी फाउंडेशन अक्कलकोट च्या वतीने अक्कलकोट शहर व परिसरातील सामाजिक बांधिलकीच्या नात्याने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

मा.अमोल राजे भोसले यांच्या हस्ते संपन्न

अक्कलकोट प्रतिनिधी

माणूसकी फाउंडेशन अक्कलकोट च्या वतीने अक्कलकोट शहर व परिसरातील सामाजिक बांधिलकीच्या नात्याने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले . आजच्या या स्पर्धेच्या युगात हे विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आपले कौशल्य दाखविण्यात कमी पडू नयेत म्हणून हा आमचा छोटासा प्रयत्न….भविष्यातील सुसंस्कृत पिढी घडविण्याचा माणूसकी फाउंडेशन चा मानस आहे.

अक्कलकोट शहर व परीसरातील दुसरी ते आठवी मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप रविवार दिनांक २ जुलै २०२४ रोजी सकाळी १०:३० वा. न प मुला मुलींची प्राथमिक मराठी शाळा नं 1 येथे करण्यात आले .

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त श्री अमोलराजे भोसले H V देसाई आय क्लिनिक चे डॉ सागर पवार,सामाजिक कार्यकर्ते वैभव (राजाभाऊ) नवले उपस्थित होते

यावेळी माणूसकी फाउंडेशन चे अध्यक्ष अनंत क्षीरसागर, उपाध्यक्ष आकाश शिंदे, सचिव आशिष हुंबे,योगेश महिंद्रकर,देविदास गवंडी,आकाश सुर्यवंशी मुख्याध्यापिका तडकल मॅडम, जमादार सर,साठे सर हांचाटे सर आदी शिक्षक,शिक्षिका माणूसकी फाऊंडेशन सदस्य उपस्थित होते

माणूसकी फाउंडेशन च्या या उपक्रमात आपण मोलाची साथ देऊन पुढील प्रगत पिढी घडविण्यास आपला हातभार लाभला त्याबद्दल माणूसकी फाउंडेशन च्या वतीने आपले मनःपूर्वक आभार……..
या उपक्रमा साठी नंदकुमार काटे,अनुप महाराज पुजारी,विक्रम चोरगे, , सुयोग शहा, मंदार नार्वेकर,योगेश बाबर,राहुल धस,छोटू यादव,अमित चव्हाण,संदीप रसाळ,राकेश कानडे,बाबुषा भालके,प्रज्योत अचलेर,किरण आंबट,सचिन पवार,धनाजी वणवे,महादेव पवार,संदीप वाले,झुंजे मालक, विनय जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले आपली अशीच मोलाची साथ व सहकार्य सदैव सोबत राहू दे. ही अपेक्षा…….
सूत्रसंचालन जमादार सर तसेच प्रास्ताविक तडकल मॅडम व आभार सुरवसे यांनी मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button