गावगाथा

सावित्रीबाई फुलेंनी स्त्री जातीला सन्मानाचा दर्जा दिला – महेश इंगळे

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त महेश इंगळेंचे प्रतिपादन

सावित्रीबाई फुलेंनी स्त्री जातीला सन्मानाचा दर्जा दिला – महेश इंगळे
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त महेश इंगळेंचे प्रतिपादन
(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.३/१/२६) –
भारतासारख्या संस्कृती प्रधान देशात पूर्वी अनेक न्याय निवाडे होते. त्या पार्श्वभूमीवर स्त्री जातीला अनेक बंधने होती, त्यामुळे स्त्री जन्माची कहाणी अत्यंत दयनीय होती. याच काळात दिनांक ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्याच्या नायगाव गावात खंडोजी नेवासे पाटील व आई लक्ष्मी पाटील यांच्या उदरी सावित्रीबाईंचा जन्म झाला. त्या माळी समाजातील होत्या. वयाच्या ९ व्या वर्षी त्यांचा विवाह १२ वर्षांच्या ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. तत्कालीन समाजाच्या कृप्रथांमुळे त्यांच्या काळात मुलगी वयात येण्याअगोदरच बालविवाह, विधवा महिलांवरील अत्याचार या रूढी परंपरांमुळे त्यांना नेहमी महिलांप्रती असलेली समाजाची मानसिकता पाहून त्यांचे मन हे हेलावत असे, आणि या मानसिकतेतूनच त्यांनी त्या काळात महिलांच्या ज्ञानज्योतीची मशाल पेटवली. यानंतर त्यांचे पती ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. हळूहळू त्यांनी १८ शाळा उघडल्या आणि इथूनच स्त्री जन्माचे भाग्य उजळण्यास सुरुवात झाले. येथूनच सावित्रीबाई फुले यांनी स्त्री जातीला खऱ्या अर्थाने सन्मानाचा दर्जा दिला असे प्रतिपादन येथील श्री.वटवृक्ष महाराज देवस्थानचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी केले. नुकतेच येथील प्रभाग क्र. ११ मधील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे यांच्या संपर्क कार्यालय येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महेश इंगळे बोलत होते. यावेळी प्रथमेश इंगळे मित्र परिवारातील आदित्य गवंडी, समर्थ मचाले, समर्थ जाधव, समर्थ स्वामी, दर्शन घाटगे, अमोल महाडीक, अथर्व इंगळे, रमेश शिंदे सर, प्रतीक इंगळे, प्रसाद माने इत्यादी उपस्थिस्त होते.
(चौकट – सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवून पुरुषांच्या समानतेचा दर्जा, समतेची प्रतिमा मांडली. जिथे महिलांना केवळ सन्मान मिळाला नाही, तर जीवन जगण्याचा नवा मार्ग सापडला. त्यांच्या या कार्याने आज बालविवाहावर बंदी आहे, विधवांवरील अत्याचाराला लगाम आहे. आणि महिलांचे कल्याण आहे. सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या महिला शिक्षिका ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांच्या हितासाठी व्यतीत केले. अशा या थोर व्यक्तीमत्वाप्रती विनम्र अभिवादन – प्रथमेश इंगळे युवा नेतृत्व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, अ.कोट)
फोटो ओळ – ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेस अभिवादन करताना प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button