ग्रामीण घडामोडी

समाजसेवक रियाज़ सैय्यद यांचा पटेल प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान.

वळसंग येथील पटेल प्रतिष्ठान चा उपक्रम

समाजसेवक रियाज़ सैय्यद यांचा पटेल प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान.

HTML img Tag Simply Easy Learning    

——————————————————-
सोलापुर येथील समाज सेवक अबुहुरैरा उर्फ रियाज़ सैय्यद यांनी रिफाह फाउंडेशन तथा साद मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलच्या माध्यमातून सोलापुर शहर व परिसरात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि रुग्ण सेवेच्या माध्यमातून हजारो सर्वधर्मीय गरजूंना दिलेली मदत तथा कोरोना काळात हजारो कुटुंबियांना दिलेला मदतिचा हात याची दखल घेऊन त्यांना दुबई येथे वर्ल्ड इंटरनेशन आइकॉन ऑफ बेस्ट कॉर्पोरेट सोशल रिस्पांसिबिलिटी या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आल्याबद्दल आज वळसंग येथील समाजसेवी संस्था असल्या पटेल प्रतिष्ठान वळसंगच्या वतीने वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांच्या हस्ते तथा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत समाजसेवक रियाज़ सैय्यद यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते नव्याने पदभार स्वीकारलेले वळसंग पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच श्रीशैल दुधगी हे होते या कार्यक्रमाप्रसंगी वळसंग गावचे माजी सरपंच सिद्धाराम कोडले,महादेव होटकर,होटगी गावचे उप सरपंच असीम शेख,सादिक पटेल,पटेल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्षअल्ताफ़भाई पटेल,हारून अमलिचुंगे,सिद्धारुढ़ काळे,शरणबसवेश्वर कलशेट्टी,गुरुनाथ माणकोजी,खंडू शिंदे,दिनकर नारायणकर, विरेश बाग़लकोटी, मल्लिनाथ बाबानगरे,दीपक गायकवाड़,पंडित हिरेमठ,मुख्तार कुरैशी,पिरसाब अमलिचुंगे,करीम फुलारी,मलकप्पा कोडले,अकबर तडमुड़,लक्ष्मण घोड़के,गजानन भुसनगी यांच्यासह वळसंग व परिसरातील मान्यवर उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button