गावगाथा

कल्याणशेट्टी शिक्षणासंकुलात गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती साजरी

दिनविशेष

कल्याणशेट्टी शिक्षणासंकुलात गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती साजरी
अक्कलकोट :
श्रीनिवास रामानुजन यांनी गणितीय विश्लेषण व संख्या सिध्दांत तसेच अपूर्णांक यामध्ये उल्लेखनीय योगदान दिले. त्यांचे संशोधन प्रेरणादायी असून विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घेऊन गणिताचा अभ्यास केला पाहिजे असे प्रतिपादन पुनम कोकळगी यांनी केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित सौ . सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक मराठी , सेमी इंग्रजी तसेच उच्च माध्यमिक विद्यालय व मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयात श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी संचालक मल्लिकार्जुन मसुती, रूपाली शहा, प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी,दिगंबर जगताप उपस्थित होते.
त्यापुढे म्हणाले की, श्रीनिवास रामानुजन अत्यंत लहान आयुष्यात त्यांनी गणितीय सिद्धांत मांडले, जगभरातील विद्वानांनी त्यांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक केले. त्यांच्यामुळे गणिताची नवीन दालने खुली झाली, अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी गणितीय विश्व निर्माण केले.
यावेळी गणित शिक्षक विजयालक्ष्मी वाले, विद्या बिराजदार, लक्ष्मी इरशेट्टी, रविकिरण दंतकाळे, दीपक गंगोंडा आदी उपस्थित होते.
प्रारंभी श्रीनिवास यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी सौंदर्या खांडेकर, स्नेहा देडे या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. यानंतर गणितावर आधारित समूह नृत्य सादर करण्यात आले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी श्रद्धा मोरे व आदिती बाणेगाव यांनी केले तर सर्वांचे आभार विद्यार्थिनी सिद्धी बाबर हिने केली.
चौकटीतील मजकूर
गणित दिनानिमित्त चित्रकला व मेहंदी स्पर्धा घेण्यात आले होते. या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना यावेळी पारितोषिके देऊन कौतुक करण्यात आले.
फोटो ओळ
श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना पूनम कोकळगी व मान्यवर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button