गावगाथा

स्वातंत्र्य दिनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन माझी शाळा फौंडेशन सोलापुर चा अभिनव उपक्रम

सोलापुर माझी शाळा फौंडेशन ,श्री सिध्देश्वर प्रशाला माजी विद्यार्थी आणि श्री गोपाबाई दमाणी रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे

स्वातंत्र्य दिनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन माझी शाळा फौंडेशन सोलापुर चा अभिनव उपक्रम

सोलापुर माझी शाळा फौंडेशन ,श्री सिध्देश्वर प्रशाला माजी विद्यार्थी आणि श्री गोपाबाई दमाणी रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.यंदाचे रक्तदान शिबिराचे हे सलग दहावे वर्ष आहे. सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी श्री सिध्देश्वर प्रशाला सोलापुर माजी विद्यार्थी सन १९९४-९५ बॅच हे एकत्र येऊन या शिबिराचे आयोजन करतात. मागील दहा वर्षात आतापर्यंत एकुण सुमारे ८०० ते ९०० रक्तपिशव्यांचे रक्त संकलन माझी शाळा फौंडेशन यांच्या आयोजित शिबिरातुन करण्यात आले आहे तर गरजुंना मोफत रक्त पुरवठा देखील करण्यात आले आहे. प्रत्येक रक्तदात्यांसाठी अल्पोपहाराची सोय आनंद हलवाई श्री धनंजय मोटगी यांच्या वतीने करण्यात येणार आहे. आपल्या अखंड भारत देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिन आनंदोत्सवात सर्वांनी सामाजिक बांधिलकी जपत ऐच्छिक रक्तदान करावे असे आव्हान माझी शाळा फौंडेशन सोलापुर व श्री सिध्देश्वर प्रशाला व माजी विद्यार्थी यांच्या वतीने करण्यात आले आहे.रक्तदान शिबिराचे आयोजन दिं १५ ॲागस्ट २०२४ वार गुरुवार रोजी श्री सिध्देश्वर प्रशाला कलाभवन येथे सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत करण्यात आले आहे.पुढील अधिक माहीती साठी फौंडेशनच्या खालील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा हि विनंती.

माझी शाळा फौंडेशन सोलापुर
१) श्री राहुल प्रमोद अक्कलकोटकर- अध्यक्ष- ९४२३५९१०८३
२) श्री सिध्देश्वर शरणप्पा बिराजदार-सचिव. ८१४९४६५७७७
३) श्री संतोष गोपाळ नारायणपेठकर- उपाध्यक्ष- ९८२२३०३०८०
४) श्री अमोल जयकुमार कनशेट्टी- खजिनदार- ९४२१२२९९९९

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button