श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा वतीने दिला जाणारा ‘गुणीजन गौरव पुरस्कार धोंडपा नंदे’ प्रदान..
सत्कार सन्मान

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा वतीने दिला जाणारा ‘गुणीजन गौरव पुरस्कार धोंडपा नंदे’ प्रदान..


अक्कलकोट — अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गावचे पत्रकार लेखक संपादक सामाजिक कार्यकर्ते पर्यावरण प्रेमी धोंडपा नंदे यांना प्रदान करण्यात आला श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३७ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून,
परमपूज्य मौनतपस्वी श्री जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी व पूज्य श्री बसवलिंग महास्वामीजी यांच्या शुभाशिर्वादाने सादरकर्ते कर्नाटकचे ख्यातनाम गायक राजेश कृष्णन व प्रसिध्द निवेदिका अनुपम भट आणि सहकारी बेंगळूर यांचा ‘संगीत संजे’ ह्या कन्नड कार्यक्रमाने चौथे पुष्प संपन्न झाले.या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन परमपूज्य मौनतपस्वी श्री जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी व विरक्त मठाचे मठाधिपती परम पूज्य बसवलिंग महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात डॉ. श्री व सौ शरणबसप्पा दामा, श्रीमती मल्लम्मा पसारे, उद्योजक बसवराज माशाळे, दत्तकुमार साखरे, अक्कलकोट लायन्स क्लबचे अध्यक्ष शिवानंद नंदर्गी, माजी नगरसेवक लक्ष्मीकांत धनशेट्टी, कन्नड साहित्य परिषदचे अध्यक्ष सोमशेखर जमशेट्टी, राजशेखर उमराणीकर, राजकुमार झिंगाडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
गेल्या २५ वर्षांपासून वृत्तपत्र लेखन पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या व गावगाथा दिवाळी माध्यमातून ग्रामीण संस्कृती रूढी परंपरा बदल वैशिष्ट्यपूर्ण अंक गेल्या दोन वर्षांपासून प्रकाशित करत आहेत व अक्कलकोट घडामोडी फेसबुक ग्रुप च्या माध्यमातून धोंडपा नंदे तालुक्यातील विविध प्रश्नांवर आवाज उठवला आहे याचं दखल घेऊन धोडपा नंदे यांना गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते गौरविण्यात आले
याआधी अक्कलकोट सोलापूर व पुणे येथे कार्यरत असलेले धोंडपा नंदे अनेक पुरस्कार मिळाले आहेत अन्नछत्र मंडळाचा गुणीजन गौरव पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल सर्वच क्षेत्रातून कौतुक अभिनंदन होतं आहे.तसेच धोडपा नंदे यांनी मा.अमोलराजे भोसले व अन्नछत्र मंडळांचे आभार व्यक्त केले आहे
