गावगाथा

*ग्रामीण विद्या विकास सेमी इंग्लिश स्कूलची बालदिंडी भक्तीभावात संपन्न!*

वारी पालखी सोहळा विशेष

*ग्रामीण विद्या विकास सेमी इंग्लिश स्कूलची बालदिंडी भक्तीभावात संपन्न!*

HTML img Tag Simply Easy Learning    

चपळगाव 
आषाढी एकादशी निमित्त आज ग्रामीण विद्या विकास सेमी इंग्लिश स्कूल च्या चिमुकल्यांची बालदिंडी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
सर्वप्रथम प्राचार्य माने सर, पर्यवेक्षक बानेगाव सर, CEO नीलकंठ पाटील सर व सेमी इंग्लिश स्कूल प्रमुख शेख मॅडम यांच्या उपस्थितीत दिंडीचे पूजन करण्यात आले.

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी उपस्थित विद्यार्थी *विठ्ठल, रखुमाई, संत महात्मे, वारकरी इ…टाळ, पताका, तुळशी पात्रसह* आकर्षक वेशभूषेत विठ्ठल नामाचे गजर व जयकार करीत होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

*गावातील वेशीमध्ये, मुख्य बाजार ठिकाणी व श्री मल्लिकार्जुन मंदिरात सेमी इंग्लिश च्या चिमुकल्यांनी *माऊली माऊली व विठुरायाची नगरी, पंढरी पंढरी…* या भक्तीगीतावर समूह नृत्य सादर केले.
या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. पंडित पाटील साहेब बाजार गल्लीत येथे व के. बी. पाटील सर यांनी मंदिरात दिंडीचे स्वागत केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

या दिंडीचे यशस्वी नियोजन उडचण मॅडम,दुलंगे सर, मल्लिनाथ पाटील सर, भंगे सर,बुऱ्हाणपूरे मॅडम,इंगुले मॅडम,शेख मॅडम, स्वामी सर व सेमी इंग्लिश विभागातील सर्व स्टाफ व मदतनीस वर्ग यांनी केले.या दिंडी साठी सेमी इंग्लिश स्कूल पालकांचे सहकार्य लाभले.
दिंडीतील विद्यार्थ्यांचे भक्ती उत्साह व शिस्त पाहून गावकऱ्यांनी कौतुक केले.
🚩🚩🚩🚩🚩🚩

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button