गावगाथा

श्री स्वामी समर्थ हे भक्तीचे तर श्री तुळजाभवानी माता शक्तीचे प्रतीक आहे.अन्नछत्र मंडळ हे “भक्ती-शक्तीचे केंद्र “ठरले आहे.*

नवरात्र विशेष

श्री स्वामी समर्थ हे भक्तीचे तर श्री तुळजाभवानी माता शक्तीचे प्रतीक आहे.अन्नछत्र मंडळ हे “भक्ती-शक्तीचे केंद्र “ठरले आहे.*

अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ केवळ महाराष्ट्रात नाही तर देश-विदेशात सेवाभावी कार्याने प्रसिद्धीला आलेले आहे. अन्नछत्र मंडळाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री स्वामी समर्थ यांची शिल्पाकृती जीवन चरित्रे साकारली आहेत, तसेच सुंदर वाटिका आहे.

आता तुळजाभवानी मातेचे मंदिर हे अन्नछत्र मंडळाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभव वाढविणारे ठरले आहे. अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्याकडे अनेक भक्तांनी न्यासाच्या परिसरात श्री तुळजाभवानी मंदिर असावे अशी मागणी केली होते. ३५×२० आकाराचे असणारे हे मंदिर शिल्पकार राघवेंद्र (तेलंगणा) आणि त्यांच्या ४० सहकाऱ्यांनी अवघ्या एका वर्षभरात पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे या मंदिरासाठी कसल्याही प्रकारचे सिमेंट, स्टील वापरलेले नसून, प्राचीन शिल्प कलेप्रमाणे दगडी चिरे एकमेकांमध्ये सांधले गेले आहेत.

३५×२० फुटांचे हे मंदिर १६ नक्षीदार खांबावर उभे आहे. प्रत्येक खांबावर भारतीय संस्कृतीची छाप आहे.
मंदिराचा गाभारा आठ खांबी तर गाभाऱ्यासमोरील मंडप आठ खांबी आहे. मुख्य मंदिरावर सुंदर नक्षी कोरली आहे. यामध्ये सप्तपर्णी मंगल कलश, स्वस्तिक चिन्ह आहेत. पहिल्या टप्प्यावर राज ऐश्वर्य दर्शविणारे १२ गजराज आहेत तर दुसऱ्या टप्प्यात ३४ गजराज आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारावर द्वाररक्षक असून, या ठिकाणी प्रवेशद्वारावर सोळा त्रिशूल आणि सोळा डमरू साकारले आहेत. प्रवेशद्वारावर प्रथम श्री गणेशाची प्रतिकृती आहे, त्यानंतर गजांतलक्ष्मी साकारली आहे.

मंदिराच्या भिंतीवर गायत्री, अन्नपूर्णा, सिध्दयानी, सिंहारुढीनी, कात्यायनी, सरस्वती, धान्यलक्ष्मी, महागौरी, शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, महाकाली,चंद्रघंटा आदी देवतांची प्रतिकृती साकारली आहे.सभोवताली ५६ पाकळ्यांचे तोरणं, पांच सप्तपर्णी मंगल कलश आणि स्वस्तिक आहेत.

मुख्य गाभार्यात चांदीच्या मेघडंम्बरीत गंडकी शिळापाषाणापासून बनविलेली श्री तुळजाभवानीची महिषासूरमर्दिनीस्वरुप अष्टभुजा मूर्ती आहे. भवानी मातेचे दर्शन घेताना भक्ताला श्रीक्षेत्र तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मंदिरात आहोत असा भास होतो, इतके साधर्म्य जपण्यात आले आहे. मुख्यमंदिरासमोरिल मंडपात प्रकाशाची उधळण करणारे झुंबर लक्षवेधी आहे. देवी समोर सिंह आणि कासव विराजमान आहेत.

मंदिराच्या आगमन द्वारासमोर यज्ञवेदी आणि तुळशीवृंदावन आहे त्यावर गजांत लक्ष्मी, स्वस्तिक, शिवपिंड आणि ओंम साकारले आहे. बाजूलाच अकरा फूट उंचीच्या दोन दीपमाळा आहेत प्रत्येकावर ४१ दिवे प्रकाशमान असतात. त्याच्यासमोरच दोन्ही बाजूला शमी आणि आपटा वृक्षांचे रोपण केले आहे.दोन प्रदक्षिणा मार्ग आहेत सागवानाचा वापर केला आहे.कौलारु आच्छादन आहे.रेखीव आणि भारतीय संस्कृतीची प्रतीके कोरलेला उंच कळस त्यावर डौलाने फडकणारा भगवा ध्वज शिवरायांच्या राष्ट्रधर्माची आठवण करून देतो. मंदिराचा परिसर निसर्गरम्य वनराईने नटलेला आहे.

*🔶चौकट :*
शारदीय नवरात्र महोत्सानिमित्त महिलांच्या उपस्थितीत सप्तशश्री महिलांच्या उपस्थितीत सप्तशशी आणि श्री सूक्त पारायण तसेच कुमकुम अर्चना विधीचे आयोजन हिरकणी संस्थेच्या सचिवा सौ.अर्पीताराजे अमोलराजे भोसले यांनी केले आहे. तसेच महाभोंडल्याचे आयोजन केले. महाअष्टमी निमित्त होम-हवन करण्यात आले.

*🔶चौकट :*
*⭕न्यासाचे श्री तुळजाभवानी माता मंदिर :*
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे धर्मादाय न्यास गेल्या ३७ वर्षापासून श्री स्वामी समर्थांचे अन्नदानाचे सेवाकार्य अविरतपणे करित असून, नेत्रदिपक प्रगतीची वाटचाल करीत आहे. या अन्नदानाच्या सेवा कार्याबरोबरच समाजिक बांधिलकी जपत सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आरोग्य, क्रीडा व पर्यावरण विषयक उपक्रम राबविते तसेच जळीत, पूर, भुकंपग्रस्तांना नेहमीच मदतीचा हात पुढे करते, तसेच शासनाचे विविध उपक्रम राबविण्यात हे न्यास अग्रेसर आहे.

अलीकडे अन्नक्षेत्र परिसरात स्वामी समर्थ वाटिका व बालोद्यान, श्री तुळजाभवानी माता मंदिराची उभारणी करण्यात आली असून, सदर मंदिर काळ्या दगडाचे प्राचीन शिल्पशैलीत आहे” श्री भवानी मातेची मुर्ती बंडकी पाषाणातील आहे. नारळी पौर्णिमेनिमित्त दि. १९ ऑगस्ट २०२४ रोजी मुर्तीची स्थापना करण्यात आली. मंदिरात बंगलोरी कौलारीचे ‘चारीबाजूस शेड आहे. समोर २ दीपमाळा आहेत, त्याची उंची १२ फुटाची आहे. नवरात्र महोत्सवानिमित्त पूजा, अर्चा, अभिषेक, आरतीसह आदि विधी होत असतात. यंदा मंदिरा लागत जागेत शिवराज्याभिषेक सोहळा’ हा हलता देखावा उभारण्यात आला.

श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी शहरवाशियांसह परगावच्या स्वामी भक्तांची अलोट गर्दी होत आहे. श्री तुळजाभवानी मंदिराची संकल्पना न्यासाचे कार्याध्यक्ष विजय उर्फ अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांची असून, न्यासाचे संस्थापक जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या मंदिर उभारण्यासाठी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त संतोष भोसले, भाऊ कापसे, अभियंता किरण पाटील, अमित थोरात व न्यासाचे विश्वस्त आणि बऱ्याच सेवेकऱ्यांचे योगदान लाभले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button