गावगाथा

दुसऱ्या संत चोखामेळा साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हांचे अनावरण

साहित्य संमेलन 2024

दुसऱ्या संत चोखामेळा साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हांचे अनावरण

धाराशिव : संत चोखामेळा अध्यासन केंद्र व वृंदावन फाऊंडेशन , पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार २८ व रविवार २९ सप्टेंबर रोजी तीर्थक्षेत्र पैठण येथे होणाऱ्या दुसऱ्या संत चोखामेळा साहित्य संमेलन २०२४ च्या बोधचिन्हांचे अनावरण देवशयनी आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी धाराशिव शहरातील संत मुक्ताबाई मंदिरात
संत मुक्ताबाई यांच्या परम भक्त , अभ्यासक व त्यांच्या विचार कार्याच्या प्रसारक मंगलताई वाघ यांच्या शुभहस्ते करण्यात आले . याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत शेषाद्रीआण्णा डांगे , अजयराव जानराव , साहित्यिक डॉ.रूपेशकुमार जावळे , सतिशराव कोळगे ,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र धाराशिव येथील प्रो. डॉ.महेश्वर कळलावे उपस्थित होते . संत चोखामेळा अध्यासन केंद्राचे संस्थापक सचिन पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करत दुसरे संत चोखामेळा साहित्य संमेलन , पैठण व बोधचिन्ह संबंधित आपली भूमिका मांडली.

” सोयराबाई : संत , कवी आणि माणूस ” असा मध्यवर्ती आशय घेऊन संपन्न होत असलेले दोन दिवसीय साहित्य संमेलन एकूण सहा सत्रात विभागून होणार असून महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील नामवंतांच्या उपस्थितीत तीर्थक्षेत्र पैठण येथे शनिवार २८ व रविवार २९ सप्टेंबरला संपन्न होणार आहे. या साहित्य संमेलनात परिसंवाद, चर्चासत्र,कविसंमेलन , संत साहित्य प्रदर्शन, उद्बबोधन व संत साहित्याचे देखावे असणार आहेत. सदरील संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून संत सोयराबाई यांच्या साहित्याचे अभ्यासक , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे च्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे असणार आहेत .
सदरील बोधचिन्ह अनावरण सोहळ्यास साहित्यिक बाळ पाटील , ऍड. महारुद्र जाधव , राजेंद्र मोरे , पांडुरंग मते आदींची प्रमुख उपस्थिती होती . कार्यक्रमाचे निवेदन डॉ. कृष्णा तेरकर तर आभार विजय गायकवाड यांनी मानले . याप्रसंगी धाराशिव शहरातील साहित्यिक , सांस्कृतिक , आध्यात्मिक , सामाजिक परिघातील विविध मान्यवर उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button