गावगाथा

सदगुरू श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराज यांचे दिव्य सानिध्यात गुरुपौर्णिमा यात्रा महोत्सवनिमित्त देशभक्ती कार्यक्रमासह विविध धार्मिक कर्यक्रम आयोजित

गुरुपौर्णिमा विशेष

अक्कलकोट दि. १७
    सोलापूर पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील भिगवण आणि स्वामी चिंचोली सरहद्दीवर वसलेले श्रीक्षेत्र भक्तीलिंग मल्लिनाथ महाराज देवस्थान येथे जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदगुरू श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराज यांचे दिव्य सानिध्यात गुरुपौर्णिमा यात्रा महोत्सवनिमित्त देशभक्ती कार्यक्रमासह विविध धार्मिक कर्यक्रम आयोजित केले आहेत.
संसाराच्या व्यापातून थोडाकाळ विश्रांती मिळावा आणि भक्ताने आपले जिवन सार्थक करून शिव भक्तीतून देश भक्ती मार्गाकडे वळावे, या प्रमुख उद्देशाने सदगुरु श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराजांनी आंध्रप्रदेश, तेलगण, कर्नाटका, महाराष्ट्रा, गुजरात, राज्यस्थान अशा अनेक राज्यासह संपूर्ण देशभरात सुमारे सहा हजारोहून अधिक शिवलिंग मंदिर आणि जय भारत माता सेवा समितीचे शाखा स्थापना केले आहेत. त्या पैकी भिगवण (स्वामी चिंचोली) येथील भक्तीलींग देवस्थान हे सर्वोच्च असून नवसाला पावणारा स्वयं जागृत सर्व धर्मीय श्रद्धास्थान देवस्थान आहे.
या गुरुपौर्णिमा यात्रेस प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही देश भरातील लाखो भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येणार असल्याने यात्रा कमिटीचे वतीने यात्रेची जयत्त तयारी करण्यात येत आहे. शनिवार दि.२०जुलै रोजी रात्रौ देशभक्ती गीत, भजन, भारुड इत्यादी कार्यक्रम होणार असून रविवार दि.२१ रोजी पहाटे श्री चे महापूजा, महारुद्राभिषेक, नवग्रह पूजा, होमहवन  इत्यादी कार्यक्रम होणार आहे. सकाळी आठ वाजता श्रीचे भव्य पालखी मिरवणूक विविध वाद्य समवेत काढण्यात येणार आहे. शनिवार आणि रविवार दिवसभर भक्ताचा राजा सदगुरु श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराजाचा दर्शन सोहळा कार्यक्रम आहे.तरी भाविक भक्त आणि देश भक्तांनी उपस्थित राहून सदगुरूचा दर्शन, महाप्रसादाचा आणि देशसेवेचा आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटी वतीने करण्यात आला आहे

*चौकट*
(चौकट मध्ये महारांजाचा फोटो घेणे)
गुरू सेवा पेक्षा देश सेवा सर्व श्रेष्ठ आहे.सर्व भक्तांनी अंतकरणातून देश सेवा केला पाहिजे. इतर पूजा आणि सेवा पेक्षा देश सेवा सर्व श्रेष्ठ आहे. देश वाचला तरच आम्ही सर्व जण वाचणार आहोत. देशाचे एकता परंपरा अखंडपणे राखण्यासाठी सर्वांनी देशच माझे घर देशच माझे परिवार असे समजून एकजुटीने राहिले पाहिजे.
– सदगुरु श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराज
अध्यक्ष
राष्ट्रीय संस्थापक जय भारत माता सेवा समिती नवी दिल्ली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button