*आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मतदार संघातील मुलभूत सुविधाचीगरज ओळखून आणलेला निधी लक्षणीय ,विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे महत्वपूर्ण कार्य होत आहे — शिवानंद पाटील*
विकास कामे

*आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मतदार संघातील मुलभूत सुविधाचीगरज ओळखून आणलेला निधी लक्षणीय ,विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे महत्वपूर्ण कार्य होत आहे — शिवानंद पाटील*

🔶अक्कलकोट :(प्रतिनिधी)
*आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मतदार संघातील मुलभूत सुविधा करिता गरज ओळखून आणलेला निधी लक्षणीय असून, विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे महत्वपूर्ण त्यांच्याकडून ५ वर्षात होत असल्याचे मनोगत माजी जि.प.अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी व्यक्त केले.*

ते गुरुवारी अक्कलकोट तालुक्यातील शावळ फाटा ते कुडल व कुडल ते देवीकवठे रस्ता सुधारण करणे रुपये १० कोटी कामाच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी शिवानंद पाटील बोलत होते. आमदार कल्याणशेट्टी म्हणाले की, मतदार संघाचा चौफेर विकास व्हावा यासाठी राज्याच्या प्रत्येक विभागातून निधी आणण्यात आला. याबरोबरच केंद्राचा देखील निधी आणण्यात आला. मतदार संघातील आत्तापर्यंत केलेल्या विकास कामांची माहिती त्यांनी दिली.

यावेळी मोतीराम राठोड, परमेश्वर यादवाड, विवेकानंद उंबरजे नितीन चव्हाण सुरेश गड्डी बाबुशा कोरपे, सागर हिप्परगी, मल्लू नागशेट्टी शिवानंद मानशेट्टी, बसवराज माने, श्रीकांत पवार, भरत पवार, सुरेश कामठी, यलप्पा कामठी, रमेश येळमेली,सिद्धू सुरवसे,भरमणा पुजारी,राज पुजारी, संजय पवार, विष्णू पवार, संजय भोसले, पुंडलिक पुजारी,भरत पवार, दत्ता पुजारी,श्रीमंत पुजारी श्रीकांत पवार तात्या पवार अण्णाराव कुसेकर,गुजाबाई संगप्पा जमादार, परमेश्वर जमादार, सुनिता चव्हाण चंद्रकांत यादवाड, निगणा जमादार,संगमेश पुजारी, काशिनाथ यादवाड, प्रभाकर जमादार, माडीवळया स्वामी, इमाम मुजावर, अशोक पाचवे, भिमाशंकर जमादार, सोमय्या स्वामी, बसवराज पाचवे, दयानंद कांबळे, शाहरुख तांबोळी, ज्ञानेश्वर गुडनूर,सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
