गावगाथा

मुरूम येथे मुस्लिम समाजाचे गजापूर घटनेच्या निषधार्ध जनआक्रोश दंगेखोरावर कठोर कारवाई करण्याची निवेदनाद्वारे केली मागणी

निवेदन

मुरूम येथे मुस्लिम समाजाचे गजापूर घटनेच्या निषधार्ध जनआक्रोश दंगेखोरावर कठोर कारवाई करण्याची निवेदनाद्वारे केली मागणी

मुरुम, ता. उमरगा, ता. १९ (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील गजापूर घटनेच्या निषधार्थ मुरूम शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने निषेधपर घोषणा देत मोर्चा काढून समाजकंटक दंगेखोरावर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस ठाण्यामार्फत राज्याचे गृहमंत्री यांना निवेदन देऊन करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक विशाळगडावर बाबा रेहान मलिक यांच्या दर्गा शेजारी असणारे अतिक्रमण हटवायच्या नावाखाली १५ जुलै रोजी काही समाजकंटकाकडून गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गजापूर गावातील मुस्लिम व इतर समाजाची घरे व मशिदी वरती हल्ला करून विटंबना करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ मुरूम शहरातील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने शुक्रवारी ता. १९ रोजी दुपारी दोन वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढून निषेधपर घोषणा देत मुरूम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात समाजकंटकांनी केलेले या घटनेमुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सदर घडलेली घटना साताऱ्याच्या पुसेसावळी येथील जातीय दंगलीची पुनरावृत्तीच असल्याचे दिसत आहे. गडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली समाजकंटकांनी केलेले हे कृत्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला शोभणारे नाही, असे नमूद करून तात्काळ दंगलखोरांवर कठोर कारवाई करून येथील उध्वस्त झालेल्या घरांचे व मशिदीचे पंचनामे करून पिढीताना मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी बाबा कुरेशी, राजू मुल्ला, अय्युब मौलाना, शौकत मौलाना, शाहिद येणेगुरे, शहबाज कुरेशी, खाजामिया नुरसे, बशीर जमादार, युसुफ शेख, मलंग डुरके, डॉ. खाजालाल ढोबळे, नहीरपाशा मासुलदार, शफिक जेवळे, गौस मुल्ला, अल्ताफ जेवळे, हुसेन तांबोळी, नदीम इनामदार, नजीर जेवळे, जाफर कोतवाल, करीम ढोबळे, शकील मुर्डी, शहाबाज कुरेशी, आलताफ चाऊस, फयाज फरदू, वसीम मुल्ला, जैनुद्दीन सन्नाटे, मुजम्मिल शेख यांच्यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button